मोक्षाच्या प्रचलित संकल्पनांना छेद देणारे आणि वाचकांचे जीवन बदलून टाकणारे पुस्तक मोक्ष… मृत्यूनंतर नव्हे… जिवंतपणीच! आत्ता… याच क्षणाला.
मोक्ष म्हणजे मुक्ती… भीतीपासून, चिंतेपासून, अगदी शारीरिक बंधनांतूनसुद्धा… मोक्षानंतर असतो केवळ आनंद. शब्दांमध्ये वर्णन न करता येणारा पण प्रत्येक क्षणी अनुभवता येणारा, जीवन व्यापून टाकणारा – तेजआनंद. म्हणून मोक्ष आहे सुखी जीवनाची गुरुकिल्ली आणि अलौकिक यशाचा राजमार्ग. हे तेजयश, हा तेजआनंद, हे सुखी जीवन म्हणजेच मोक्ष कसा प्राप्त करायचा, मोक्ष आपल्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट कसे, याचा मार्ग सोपा करून दाखवणारे पुस्तक.
मोक्ष… या कल्पनेबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचलित असलेली एक समजूत अशी की मोक्ष हा माणसाला त्याच्या मृत्यूनंतरच मिळतो. पण ही समजूत अगदीच चुकीची कशी आहे, हे या पुस्तकात वाचणार आहोत. आपण कोण आहोत? हा देह गेल्यावर आपण कुठे असणार? हे ज्ञान होणे म्हणजेच मोक्ष. यासाठी मृत्यू व्हायची वाट बघावी लागत नाही. ‘याचि देही, याची डोळा’ हे ज्ञान होऊ शकतं.
मोक्ष आपल्या अंतरंगातच आहे व आपल्याच अस्तित्वाचाच एक अभिन्न भाग आहे. मोक्ष हा अतिशय गहन विषय, सामान्य माणसालाही समजेल अशा सोप्या व लोकभाषेत या पुस्तकात सांगितला आहे.
Reviews
There are no reviews yet.