नात्यांत नवप्रकाशाचा उदय मानवाचं पृथ्वीवर येण्याचं मूळ उद्दिष्ट म्हणजे नात्यांना योग्य प्रकारे निमित्त बनवून नवप्रकाश किरणांनी ती उजळून टाकणं होय. त्याचबरोबर विश्वासाच्या पुष्परूपी सुगंधाने नातेसंबंधांना ओतप्रोत भरून, ते टिकवण्यासाठी चिरस्थायी प्रेम कसं करावं, परिवाररूपी वृक्षांची तोड कशी थांबवावी? अहंकाराची आरी आणि कपटरूपी कुर्हाड नष्ट कशी करावी? नातेसंबंधाच्या आसक्तीतून मुक्त कसं राहावं? या सर्व गोष्टी आपण प्रस्तुत पुस्तकात जाणणार आहोत.
पृथ्वीवर आपल्याला सदैव उत्साही, सजग आणि सतेज राहण्यासाठी ही खास व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्यातील भावना प्रकट व्हाव्यात यासाठी आपल्याला अनेक नातलग दिले असून ते आपल्या सभोवताली विशेष वातावरण तयार करत असतात. पण आपण त्यात आनंद मानतो का? यासाठी नियतीची ही सुंदर व्यवस्था जाणून नातेसंबंधात माधुर्य आणण्याचा प्रयत्न करायला हवा. नात्यांमध्ये परिपूर्णता आणून, दुरावा कसा नष्ट करता येईल याचं उत्तम सादरीकरण या पुस्तकात करण्यात आलंय.
प्रस्तुत पुस्तक तुम्हाला मदत करेल, आत्मसमृद्ध परिवाराच्या निर्माणासाठी. हे निर्माणकार्य जेव्हा प्रत्यक्षात साकार होईल, तेव्हा मधुर नात्यांचं आनंदगाणं घराघरात, मनामनात क्षणोक्षणी झंकारेल.
Reviews
There are no reviews yet.