कबीरवाणी आत्ममंथन
कधीतरी स्वतःला समजून घ्या…!
मंथनातून मिळेल अस्सल गीता
प्रगत आणि स्थितप्रज्ञ होण्याचा मार्ग म्हणजे आत्ममंथन होय. आत्ममंथन म्हणजे ‘स्व’वर मनन-चिंतन करणे. तुम्ही कधी दही घुसळले आहे का? दही घुसळल्यानंतर लोणी मिळते. तसं पाहिलं तर लोणी दह्यातच लपलेले असते. पण त्याला बाहेर काढण्यासाठी मंथन-घुसळण आवश्यक असते. मगच लोण्यातून अस्सल तूप मिळते. अगदी याचप्रमाणे आत्ममंथनातून, मनाच्या घुसळणीतून आपल्याला खरी गीता निर्माण करायची आहे.
जीवनाच्या महाभारताततही प्रत्येकाची गीता, भूमिकाही वेगवेगळी असते. म्हणूनच प्रत्येकाने आत्ममंथन करायला हवे; कारण रवी आपल्याच हातात आहे. जीवनातील कडूगोड अनुभवातून आपण शिकतच असतो पण कोणतीही ठेच न लागता आत्ममंथनाच्या शक्तीच्या आधारे आपण बोध प्राप्त करू या.
प्रस्तुत पुस्तकाद्वारे स्वतःला जाणून आपल्या खर्या स्वभावाची ओळख करून घ्यायला हवी. संस्कार आणि वृत्तीतनू मुक्त व्हायला हवं. जेणेकरून आपण आपल्या ‘विश्वासाची गीता’ गाण्याइतपत स्वयंपूर्ण होऊ शकाल. चला तर, आत्ममंथनाच्या रवीने सत्यरूपी लोणी प्राप्त करू या.
Reviews
There are no reviews yet.