एकाग्रतेचे शिरोमणी संत एकनाथ
जीवनचरित्र आणि अमूल्य शिकवण
आज्ञा आणि एकाग्रता यांचं दुसरं नाव संत एकनाथ
आज्ञेप्रती निष्ठा आणि एकाग्रता याचं सर्वोत्तम उदाहरण कोण आहे? अर्थातच संत एकनाथ! संत एकनाथांमध्ये सत्य जाणण्याची उत्कट इच्छा असल्याने त्यांची गुरू जनार्दन स्वामी यांच्याशी भेट झाली.
प्रपंचात राहूनही सत्य कसं प्राप्त करावं, याची प्रेरणा आपल्याला संत एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्राकडे पाहून मिळते. आज जर आपल्याद्वारे सत्यात स्थापित होण्याची, सत्य स्वानुभावाद्वारे जाणण्याची प्रार्थना होत असेल, तर त्यासाठी आवश्यक घटनाक्रम आपोआपच घडेल. मग आपण योग्य स्थानी पोहोचतो. जसं, एकनाथ वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांच्या महान गुरूंकडे पोहोचले होते. तेव्हापासूनच त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली होती. चला तर, आपणदेखील हे पुस्तक वाचून आपल्या जीवनालाही नवी दिशा देण्याचा प्रयत्न करू या.
Reviews
There are no reviews yet.