सफलतेच्या शिखरावर पोहोचण्याचा फॉर्म्यूला
वय वर्षे १३ ते १९…. तारूण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्या टीन एजर्स म्हणजेच किशोरवयीन मुला-मुलींचा वयोगट. स्वत:चं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणार्या, धडपडणार्या, कधी पडणार्या आणि पुन्हा नव्यानं, नव्या उमेदीनं उभं राहणार्या किशोरवयीन मुला-मुलींचं भावविश्व साकारत असतं ते याच वयात. हे वय असतं, जीवनाविषयीची जाणीव समृद्ध करण्याचं, स्वप्नांच्या दुनियेत रमण्याचं, कधी वास्तवाला सामोरं जाताना डगमगणारं तर कधी आपल्याच शरीर-मनात खळबळ माजवणार्या नैसर्गिक बदलांना सामोरं जाताना गोंधळणारं…
पण या सर्व चढउतारांना सामोरं जाताना स्वत:मध्ये शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरांवर परिपक्वता दृढ करण्यासाठी टीन एजर्सना हवा असतो, एक हक्काचा मित्र. असा मित्र जो त्यांना समजून घेत दिशा दाखवेल आणि त्यांच्यात यशोशिखरावर आरूढ होण्याची उमेद जागवेल. प्रस्तुत पुस्तक म्हणजे टीन एजर्सना सर्वांगानं खुलवणारं ‘फ्रेन्डली गाईड’ आहे. कारण यातून तुम्ही जाणाल, सर्व समस्यांतून मुक्त होत सफलतेच्या शिखरावर पोहोचण्याचा परफेक्ट फॉर्म्यूला..
खास किशोरवयीन मुला-मुलींसाठी आणि आजच्या युवापिढीसाठी लिहिण्यात आलेलं हे पुस्तक म्हणजे चारित्र्याचा पाया भक्कम करणारा सुहृद. अनेक वर्षांच्या रिसर्चनंतर साकारलेलं हे पुस्तक म्हणजे टीन एजर्स आणि त्यांच्या पालक व शिक्षकांना मार्गदर्शन करणारा दीपस्तंभच !
Reviews
There are no reviews yet.