सत्य हे सर्वांच्या कल्पनेपेक्षा खूप मोठं असतं
कित्येक शतकांपासून मनुष्य सृष्टीतील रहस्यं शोधण्यात गुंतला आहे. पण सत्य हे नेहमी त्याच्या विचारांपेक्षा, कल्पनेपेक्षा कितीतरी मोठं असतं. तो हे जाणत नाही. जसं, आपण विचार करतो, आपल्यात सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण वाढतात. परंतु तीन गुणांमुळे आपण पुष्ट होतो, हे वास्तव आहे. निसर्गाच्या या तीन गुणांद्वारेच संपूर्ण सृष्टीची रचना झाली, ज्यात मनुष्याचाही समावेश आहे. हेच गुण मनुष्याला कार्यान्वित करतात.
गुणातीत बनून सर्व सूत्रं आपल्या हाती घेऊन, गुणांचा आवश्यकतेनुसार उपयोग करून आपण उत्तम गीता (पुरुषोत्तम) प्राप्त करू शकता. म्हणजेच जिथून या सृष्टीची रचना झाली, त्या अवस्थेचा अनुभव घेऊ शकता. हेच आपण प्रस्तुत पुस्तकाद्वारे जाणू शकाल. शिवाय- रज, तम आणि सत हे कशा प्रकारे मनुष्याला बंधनात अडकवतात?
* या तीन गुणांमध्ये गुण-दोष काय आहेत? त्यांचा लाभ कसा घ्यावा?
* आवश्यकतेनुसार हे तीन गुण कसे कमी-जास्त करावे?
* या तीन गुणांचं अतिक्रमण करून गुणातीत अवस्थेपर्यंतकसं पोहोचावं?
* गुणातीत अवस्थेतून पुरुषोत्तम हे तत्त्व कसं जाणावं?
Reviews
There are no reviews yet.