जेथे कृतज्ञता असते
तेथे निसर्गाचं वैभव फुलून येतं
एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण धन्यवाद, शुक्रिया, थँक्यू, आभार असे वेगवेगळ्या भाषांमधील शब्द वापरतो. प्रत्यक्षात धन्यवाद हा शब्द म्हणजे एक छोटीशी चुंबकीय प्रार्थना आहे. ही प्रार्थना वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे म्हटली जाते. ‘धन्यवाद’ असं म्हणताच आपल्या आजूबाजूला निसर्गातील सौंदर्य आणि शक्ती जिवंत होतात. आपल्याला निसर्गाची किमया बघण्याची संधी मिळते.
आता प्रश्न असा निर्माण होतो, की निसर्गाला जगातल्या सर्व भाषांचं ज्ञान आहे का? निसर्ग खरोखर भाषा ऐकत असता तर काय झालं असतं? सर्वांच्या आभारांचा हिशोब ठेवला गेला असता का? परंतु प्रत्यक्षात असं होतं नाही. निसर्ग भाषा नव्हे, तर आपले भाव जाणतो.
आपले शब्द नव्हे, तर त्यामागच्या भावना निसर्गात पोहोचतात. तुम्हाला हवी असलेली एखादी गोष्ट मिळाली की तुम्ही आभार मानता, म्हणजेच तुमच्यात ‘आहे’ ही भावना निर्माण होते. त्याचप्रकारे तुमच्याकडे नसलेली एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल, तरीही तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलीत, तर युनिव्हर्स ते शब्द नव्हे, तर ते भाव जाणतो. हेच आहे निसर्गाच्या वरदानाचं रहस्य, कृतज्ञतेचं वैभव, कृतज्ञतेची किमया.
हे रहस्य समजून घेऊन जर निसर्गाशी ताळमेळ साधता आला तर हा जीवनप्रवाह आपल्याला सुलभतेने आनंद आणि समाधानाकडे नेतो.
Reviews
There are no reviews yet.