लिखाण नियम
द मॅजिक ऑफ रायटिंग
लिहिता-लिहिता यशस्वी व्हा
‘जे लिहिलं ते जीवनात दिसलं’
हाच आहे का लिखाण-नियम
भविष्यात आपण जीवनाकडे कसं बघू इच्छितो? हे तुम्ही लिहून ठेवलंय का? जर नसेल तर लिहा आणि लिखाण-नियम जागृत करा. कारण लेखन ही आत्मविश्लेषण, आत्मविकास आणि यश प्राप्त करण्याची प्रभावी पद्धत आहे.
जशी, समुद्राच्या गर्भात अनेक रहस्यं दडलेली असतात, तशीच प्रत्येक मनुष्याच्या जीवनातही घटना, भावना, अनुभव आणि विचाररूपी कित्येक मर्म लपलेली असतात. आपण जेव्हा जीवनावर सखोलतेने विचार करून लिहितो, आपल्या अनुभवांना समजण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा अनेक महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान बाबी प्रकाशात येतात, ज्या आपल्याला यशोशिखरावर नेतात.
यासाठी आपल्याला लिखाण नियमानुसार कसं लिहायचं, हे शिकून ही अनमोल रत्नं प्राप्त करावी लागतील, त्यासाठी प्रस्तुत पुस्तकात वाचूया –
लिखाण नियम आणि त्याची 7 सूत्रं कोणती?
लेखनाद्वारे वर्तमानात सुंदर भविष्याची निर्मिती कशी कराल?
लेखनाद्वारे आपले आंतरिक घाव कसे भराल?
नाती विकसित करण्यासाठी, काय आणि कसे लिहाल?
लेखन सरळ आणि सर्जनशील कसं बनवाल?
भाव, विचार, वाणी आणि क्रियेसोबत लेखन जोडण्यामागे कोणतं रहस्य आहे?
आपल्या भावना आणि विचार सकारात्मकतेत कसे परिवर्तित कराल?
लेखनाद्वारे निसर्गाने दिलेल्या उपायांचे संकेत कसे ओळखाल?
लिखाण-नियमानुसार काय, का आणि कसे लिहावे?
हे पुस्तक स्वत:ला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी केवळ साहाय्यभूतच ठरणार नाही, तर जीवनाला खरा अर्थ देण्यासही कारणीभूत ठरेल.
Reviews
There are no reviews yet.