एका महान वैज्ञानिकाची प्रेरणादायी जीवनगाथा
‘सर आयजॅक न्यूटन’ विज्ञानजगतातील एक सुपरिचित असं नाव! बहुधा आपण न्यूटन यांना, सफरचंद जमिनीवर पडण्यामागचं रहस्य शोधून काढणारी व्यक्ती म्हणूनच ओळखतो. सामान्य वाटणार्या या एका घटनेवर मनन करून त्यांनी गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला जन्म दिला.
एक घाबरट, लाजराबुजरा आणि मितभाषी मुलगा, ज्याला लहानपणी लोक मंदबुद्धी असंदेखील म्हणत, तो महान वैज्ञानिक सर आयजॅक न्यूटन कसं बनू शकला? हा एखादा चमत्कार होता, की त्यांच्या अंतरंगात अशी एखादी सुप्त शक्ती दडली होती, जी त्यांना कधी पराभूत करू शकली नाही?
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर न्यूटन यांना अडचणींचा सामना करावा लागला, तरी ते त्या अडचणींवर मात करत अग्रेसर कसे होऊ शकले, हे जाणून घेणं हा खरंतर कुतूहलाचाच विषय आहे. प्रस्तुत पुस्तक हे सर आयजॅक न्यूटन यांचा आव्हानात्मक प्रवास आणि त्यांनी लावलेले महान शोध, यांविषयी बरंच काही सांगून जातं. या महान संशोधकाच्या आयुष्याविषयी जाणून आपणदेखील आयुष्याला ‘न्यू टर्न’, नवी दिशा देऊ शकाल, हीच सदिच्छा.
Reviews
There are no reviews yet.