लोकव्यवहार निवडीचं स्वातंत्र्य आपल्याच हातात…
मनुष्य आपला व्यवहार स्वतः निवडू शकत नाही, हे आश्चर्यच नव्हे का? त्याचं वागणं सदैव इतरांवर अवलंबून असतं. जसं, “तो माझ्याशी चुकीचा वागला म्हणून मीदेखील त्याला अपशब्द वापरले… त्याने माझा अपमान केला म्हणून माझा राग अनावर झाला…’ अशा गोष्टी आपण नेहमीच ऐकतो, बोलतो. याचाच अर्थ, समोरचा मनुष्य आपल्याकडून त्याला हवा तसा व्यवहार करून घेऊ शकतो. म्हणजेच खरंतर आपण बंधनात आहोत. परंतु या बंधनातून मुक्त होण्यासाठीच आपल्याला लोकव्यवहाराची कला आत्मसात करायला हवी. प्रस्तुत पुस्तकात आपण शिकाल-
* व्यवहार निवडीचं स्वातंत्र्य आणि त्यावर मार्गक्रमण करण्याचं रहस्य
* सर्वोच्च व्यवहार कधी आणि कसा करावा
* मधुर नातेसंबंधासाठी लोकव्यवहाराची योग्य पद्धत
* मैत्री जपण्याची कला
* चार प्रकारचं व्यवहार ज्ञान
* योग्य वेळी योग्य व्यवहार कसा करावा
* समग्र व्यवहार शिकण्याची पद्धत
* दुःख आणि वेदना यांमध्ये योग्य प्रतिसाद कसा द्यावा
प्रस्तुत पुस्तक म्हणजे समग्र जीवनाची गुरुकिल्लीच! हे आपल्याला मैत्री, मधुर नातेसंबंध आणि समग्र लोकव्यवहाराच्या कौशल्यरूपी खजिन्याचं कुलूप शिताफीनं उघडायला शिकवेल..
Reviews
There are no reviews yet.