एक सूत्र, जे बदलेल तुमचं अवघं आयुष्य
प्रत्येक मनुष्याचं जीवन ज्या सूत्रावर आधारित असायला हवं, ते आहे – प्रथम स्मरावा राम नंतर काम! याच सूत्राचा आधार घेऊन भरतानं अयोध्येचा राज्यकारभार सांभाळला. लक्ष्मण श्रीरामांच्या सेवेत सदैव लीन राहिले, तर हनुमानानं समुद्र ओलांडण्यापासून, लंकादहनासारखी अनेक दुर्लभ कार्ये सिद्धीस नेली. या एका सूत्रामुळे तुमचंही अवघं आयुष्य बदलू शकतं.
चला तर मग, आपणही स्वतःच्या अंतर्यामी असणाऱ्या प्रेम, कर्मभावना आणि वासनेचा परिचय करून घेऊया आणि जाणून घेऊया-
* आपल्या अंतर्यामीचा राम कोण आणि रावण कोण आहे
* आपल्या कामनांच्या, इच्छांच्या मागील भावना बदलणं का गरजेचं आहे
* प्रेम, काम आणि वासना म्हणजे नक्की काय, ते एकमेकांपेक्षा कसे वेगळे आहेत
* स्वतःच्या आणि इतरांच्या चेतनेचा स्तर कसा वृद्धिंगत करावा
* चारित्र्याचा पाया मजबूत कसा करावा
* भक्तीमध्ये येणाऱ्या बाधा दूर कशा कराव्यात
* क्रोधावर विजय का प्राप्त करावा
* संवाद साधण्याच्या शक्तीचा योग्य उपयोग कसा करावा
प्रस्तुत पुस्तकात आपल्याला श्रीरामांच्या सात गुणांविषयी जाणून घेता येईल. या गुणांवर सखोल मनन केलंत, तर ते आपल्याही व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनतील हे निश्चित. प्रस्तुत पुस्तकात रामकथेत दडलेल्या सर्व सूक्ष्म आणि मौल्यवान गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आलाय.
Reviews
There are no reviews yet.