एक नाद – एक स्मरण – भवसागर पार
वन डायमंड इज फॉर एवरी वन
हिरव्या वनात, वन… वन…चा ध्वनी कोणाला साद घालत आहे? तुम्हाला हा नाद ऐकू येतो का? का तुम्हाला तो ऐकायचा आहे? ऐकण्यापूर्वी या ‘वन’चा चमत्कार वाचा.
एका बीजात सुप्त असते वृक्षाचे सार तद्वत, एका ‘वन’मध्ये सुप्त आहे जीवनाचे सार.बीज जेवढे उत्तम तेवढी त्याची शक्यता उच्चतम असते. वास्तविक बीज एकच असते पण त्यामध्ये मुळे, बुंधा, फांद्या, फुले, पाने अनेक असतात. असे असूनही प्रत्येक पान, फूल स्वभावतःच परिपूर्ण असते. कारण ते सर्व एकाच बीजातून उत्पन्न झालेले असतात. तिथे ‘वन’ आहे, ‘वन’ डायमंड आहे, अखंड जीवन आहे.
त्या ‘वन’ला ‘एक’ला, निसर्गाच्या ‘एक’ नादाला जाणणे हे या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये तुम्ही जाणाल ः
* अनेक विचारांच्या तुफानात ‘एक’ विचार धरून शांत राहण्याची कला.
* मुकुटाशिवाय राजा बना.
* ‘एक’च्या शक्तीचा योग्य उपयोग
* मी पृथ्वीवरचा सर्वांत आनंदी असणारा माणूस आहे.
* अखंड जीवनाचे अद्भुत परिणाम
* सरेन्डर युवर गम ऑफ प्लेजर
* ‘वन’ची जाणीव तुमच्या अखंड जीवनाची दिशासूचक मार्गदर्शक कशी होईल
* हास्य-ईश्वराची भाषा
* ‘वन’ या शब्दाच्या जपाची जादू
* आंतरिक शक्ती अखंड जीवनाचा पाया
* ‘एक’ला समर्पित असे मन जीवन कसे जगाल
आंतरिक अवस्थेतून या गोष्टींचा अनुभव घेऊन तुम्ही जाणाल, कारण जे बीज आहे ते तुम्ही स्वतःच आहात. तुम्हीच ‘वन’ तर नाही?
Reviews
There are no reviews yet.