जीवनाच्या मुक्त प्रवाहात वाहण्याची कला
पत्ते खेळताना कधीकधी एखादा पत्ता सगळ्यात खाली जातो आणि खेळ संपेपर्यंत दृष्टीस पडतच नाही. तसंच आयुष्यातही आपल्याला वेळोवेळी जी शिकवण मिळते त्याबाबत असंच काहीसं होतं. काही वर्षांपूर्वी शिकलेल्या चांगल्या गोष्टी काही काळानंतर धूसर होत शेवटी आपल्या स्मृतीतून निघून जातात आणि कधीकाळी त्या शिकलो होतो, हेही आपण विसरून जातो.
उदाहरणार्थ, लहानपणी आपल्याला शिकवलेलं असतं, की सगळ्यांच्या भल्याचा विचार करा. मात्र माणूस जस-जसा मोठा होत जातो तस-तशा त्याच्या मनात द्वेष, वैर, मत्सर अशा भावना जन्म घेतात. मग याच भावना मनाचा इतका ताबा घेतात, की इतरांच्या भल्याचा विचार करणंच तो विसरून जातो. यामुळे होतं काय? आपल्या जीवनाच्या मुक्त प्रवाहात अडथळे येऊ लागतात. अशा वेळी निराश न होता या पुस्तकाची मदत अवश्य घ्या. यातून आपण समजून घेणार आहोत…
* आयुष्यातून नकारात्मक विचारांचे खडे दूर कसे कराल
* जीवनधारेच्या मुक्त प्रवाहात कसे वाहाल
* अतिरिक्त वेळेचा उपयोग उत्तम पर्याय निवडण्यासाठी कसा कराल
* योग्यतेच्या पलीकडे जाऊन ईश्वरकृपा कशी होऊ शकते
* नकारात्मक विचारांचे ऑपरेशन कसे कराल
* ‘हेल्प’ या शब्दात लपलेल्या चार अनमोल शक्तींचा उपयोग जीवनात कसा कराल
Reviews
There are no reviews yet.