कोलाहल आणि शांती यांपलीकडे असलेला निःशब्द संवाद !
आश्चर्य आणि आनंदाची इच्छा बाळगायला कोणाला आवडत नाही बरं? कारण प्रत्येक कार्यामागे मनुष्याला आनंदच हवा असतो. मात्र, या आनंदाच्या शोधादरम्यान त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, ज्यांत अनेक विषयांचा समावेश असतो. जसं –
* मानवी जीवनाचा खरा, मुख्य उद्देश काय?
* भविष्याविषयी विचार करावा, की करू नवे?
* आयुष्यात यशप्राप्ती का आवश्यक आहे?
* आजारी पडणं ही ईश्वराची इच्छा आहे का?
* अध्यात्म कोणत्या लोकांसाठी आवश्यक आहे आणि का?
* या जगात झवर आहे का? जर असेल, तर मला त्याच्या अस्तित्वावर विश्वास का नाही?
* ईश्वर भेदभाव का करतो?
* कर्म, भक्ती, ध्यान आणि ज्ञान या मार्गांचा सार काय आहे?
याव्यतिरिक्त प्रस्तुत पुस्तकात डॉक्टर, मॅनेजर, नियुधिक स्विया, दुःखी पुरुष, नोकरी करणारे, अपंग, आवारी, ज्येष्ठ नागरिक अशा लोकांचे प्रश्नही समाविष्ट आहेत.
अशा १११ विभित्र प्रश्नांची उत्तरं वाचून आपल्याला केवळ आनंदच प्राप्त होणार नाही, तर सुख-दुःखापलीकडे असलेली तेज-शांती आपण मिळवाल. प्रस्तुत पुस्तकातील संवादरूपी माध्यमाद्वारे निःशब्द होण्याची अनुभूती प्राप्त करू शकाल. एखादं कोर्ड सोडवल्यानंतर जी कुतूहलमिश्रित अवस्था निर्माण होते, तो आनंद मिळवाल.
परमेश्वरप्रामीचे सर्व मार्ग एकच असले, तरी ते विभित्र पद्धतींनी कसे सुरू होतात आणि एकाच ठिकाणी कसे पोहोचतात, ही परिपूर्ण, प्रगल्भ समज आपल्याला प्राथ होते. शिवाय, ही समजच सर्व काही असून, केवळ ती ऐकणंच पर्यात्र ठरतं. प्रस्तुत पुस्तक वाचून, ही समज अंगीकारून काला नवी दिशा देऊ या..
Reviews
There are no reviews yet.