ईश्वराचं अस्तित्व की मनुष्यस्वभाव?
या पुस्तकाचं शीर्षक वाचून आपल्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होऊ शकतात. पण निश्चिंत राहा, या पुस्तकाद्वारे आपण आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सहजतेने मिळवू शकाल. त्याशिवाय, प्रस्तुत पुस्तक आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठीदेखील उपयुक्त ठरू शकतं.
* दुःखाचा स्वीकार करून आपण ‘हो’ म्हणायला कसं शिकाल?
* ‘नकार’ अथवा नास्तिकतेस आपल्या जीवनातून हद्दपार कसं कराल?
* आस्तिक आणि नास्तिक यांच्यात फरक काय आहे?
* उलटा विश्वास अथवा नास्तिकतेतून मुक्तता मिळवण्यासाठीचे सुलभ उपाय कोणते?
* सुलटा विश्वास अथवा आस्तिकतेच्या नव्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे कसं पाहाल?
* ‘नाही’ आणि ‘होय’ यांच्या पलीकडे कोणती अवस्था आहे? ती कशी प्राप्त करता येईल?
कित्येक लोक आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करून, आपल्या अपयशाचं खापर ईश्वरावर फोडत नास्तिकतेकडे वाटचाल करतात. परंतु, हे पुस्तक नास्तिकता आणि आस्तिकतेविषयीची आपली परिभाषाच बदलून टाकेल. नास्तिकता अथवा आस्तिकतेचा संबंध ईश्वराच्या अस्तित्वाशी नव्हे, तर मानवी स्वभावाशी निगडित आहे. या पुस्तकाद्वारे आपण नास्तिकता मनुष्याचं जीवन दुःखद कसं बनवते आणि आस्तिक होऊन मनुष्य स्वतःच आपल्या आनंदाला कारणीभूत कसा ठरू शकतो, हे रहस्य जाणाल.
Reviews
There are no reviews yet.