मुलं तर उद्याचं भविष्य आहेत, मग त्यांचं संगोपन कशा प्रकारे व्हायला हवं? त्यांच्या भविष्याचा पाया कसा घडवायला हवा? याच समस्येवरील सर्वोत्कृष्ट उपाय या पुस्तकात प्रस्तुत केले आहेत. सुजाण पालकत्वाच्या बारीकसारीक गोष्टींवर प्रकाशझोत टाकणारं हे पुस्तक म्हणजे जणू त्यांच्या आई-वडिलांसाठी वरदानच आहे. प्रचलित सहज-सुलभ, सर्वसामान्य उदाहरणांद्वारे मुलांच्या मनोवैज्ञानिक स्थितीचं विश्लेषण करणारं हे पुस्तक म्हणूनच बहुपयोगी ठरतं. किमान आपल्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तरी प्रत्येक माता-पित्याने हे पुस्तक निश्चितपणे वाचायलाच हवं. या पुस्तकातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर टाकलेला दृष्टिक्षेप…
* मुलांशी संभाषण कसं करावं?
* त्यांना योग्यवेळी शिक्षा, योग्यवेळी प्रेम कसं करावं?
* सुखी कुटुंबाचा मूलमंत्र कोणता?
* मुलांची क्षमता कशी वाढवावी?
* मुलांमध्ये चारित्र्याचं निर्माण कसं करावं?
* मुलांचा संपूर्ण विकास कसा घडवावा?
या पुस्तकाच्या साहाय्याने आपण आपल्या संगोपन पद्धतीवर संस्कारांचा कळस चढवू शकाल.
Reviews
There are no reviews yet.