अज्ञान, भम्र, गैरसमजातून मुक्ती
* मृत्यूचं भय पृथ्वीवर का आहे?
* मृत्यूच एकमात्र सत्य आहे, की सर्वांत मोठा भ्रम?
* मृत्यू खरोखरच अंत आहे, की प्रारंभाचा संकेत?
* मृत्यू खरंच वास्तव स्वररूपात जागृत करतो, की केवळ आपला दृष्टिकोन बदलतो?
* मृत्यूच सर्वांचं भविष्य आहे का?
* मृत्यू अशी भविष्यवाणी आहे का, जी कधी खोटी सिद्ध होत नाही?
मृत्यूविषयी असे अनेक प्रश्न आपल्या ’नात निर्माण होत असतात. मात्र यात दडलेली गहनता जाणण्याचा प्रयत्न फारच कमी लोक करताना दिसतात. कारण ‘मृत्यू’ हे नाव ऐकूनच आपण भयभीत होतो. परंतु वास्तवापासून आपण पलायन करूच शकत नाही. ‘मृत्यू’ जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे आपण जाणतोच. पण त्याविषयीचं अज्ञान आणि भम अनेक गैरसमज निर्माण करतात.
प्रस्तुत पुस्तक, केवळ मृत्यूचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पैलूच उलगडत नाही तर मृत्यूविषयीचे अनेक गैरसमज भीती दूर करण्यासही साहाय्यक ठरतं. शिवाय महत्त्वपूर्ण प्रश्नांवर प्रकाशही पाडू शकतं, याचे पाच आधार- विज्ञान, अनुभव, योग आत्मसाक्षात्कारी संत आणि बुद्धीत परिवर्तन, मृत्यूची वास्तवता जाणण्यास ’दत करतं.
आजच्या युगातील आत्मसाक्षात्कारी गुरू ‘सरश्री’ हे या पुस्तकाचे रचनाकार आहेत. शक्तिशाली आणि सहज, सुलभ भाषेत, सोप्या शब्दांत लिहिलं गेलेलं हे पुस्तक आपल्याला नव्या, योग्य दिशेकडे जाणण्यास साहाय्यभूत ठरेल. तसेच पुन्हा एकदा शोधण्यास प्रेरित करेल जीवनाचा अर्थ…!
चला तर मृत्यूची समज प्राप्त करून, आपलं जीवन सार्थक बनवण्याच्या दिशेने अग्रेसर होऊ या.
Reviews
There are no reviews yet.