नव्या युगाची अनोखी कहाणी
प्रस्तुत ग्रंथ सत्यवान-सावित्रीच्या कथेवर आधारित असून ही नव्या युगाची कहाणी आहे. नियती प्रथम मनुष्याला सत्यापासून दूर करते, वियोग घडवते आणि मग पुनर्मिलन करते. त्यानंतरच बनते एक अमर कहाणी! मनुष्याच्या जीवनात दु:खच आलं नसतं, तर सुखाचं महत्त्व आपण कसं जाणू शकलो असतो? जसं, आकाशात तळपणार्या सूर्याला जेव्हा अचानक काळे ढग झाकोळतात, तेव्हा कुठे त्याचं अस्तित्व आपण समजू शकतो. ही गोष्ट जर सदैव स्मरणात राहिली तर आपण दु:खातदेखील आनंदरूपी नौकेत विहार करू शकाल.
सदर ग्रंथात सर्व स्त्री-पुरुषांनी सावित्रीचे गुण कसे आत्मसात करायचे? या प्रश्नाचं उत्तर तसंच अनेक समस्यांचं समाधान आणि काही सकारात्मक बाबी वाचकांसमोर प्रस्तुत करण्यात आल्या आहेत.
* स्वत:ची क्षमता कशी वाढवाल?
* अदोष अवस्थेत कसं राहाल?
* काम आणि आराम यांचं संतुलन कसं साधाल?
* निसर्गाशी ताळमेळ कसा साधाल?
* स्वत:मधील गुण कसे वृद्धिंगत कराल?
* यशाच्या मार्गात बाधा असलेला अहंकार दूर कसा कराल?
* आपल्या जीवनात विश्वासाचा चमत्कार कसा घडेल?
* प्रेरणादायी विचार करून स्वत:मध्ये सकारात्मक बदल कसे कराल?
अशा प्रकारे मोठ्यांवर गर्भसंस्कार करणारं हे पहिलं-वहिलं अद्भुत पुस्तक!
Reviews
There are no reviews yet.