सुख, शांती आणि आनंद प्राप्तीचं रहस्य
मनुष्याच्या मनात कुटुंब, समाज, नेता (लीडर्स), पैसा, शेजारी, ईश्वर एवढंच काय; पण स्वत:विषयीदेखील खूप तक्रारी असतात. जसं,
* कुटुंबातील लोकांना माझ्यासाठी वेळच नाही.
* घरात मुलं आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवतच नाहीत.
* घरी आलेल्या पाहुण्याचं स्वागत योग्यप्रकारे होतच नाही.
* माझे सहकारी त्यांचं काम नीट करतच नाहीत.
* समाजात धोका देणारे लोक खूप आहेत.
* विश्वात सर्वत्र अशांतीचं साम्राज्य आहे.
* पर्यावरणात असंतुलन वाढलंय.
* महागाई खूपच वाढली आहे.
* मी जास्त जबाबदारी घेऊच शकत नाही.
* मला यश लवकर मिळतच नाही.
अशा प्रकारे ही तक्रारींची यादी आणखीही मोठी होऊ शकते. पण मुख्य प्रश्न असा आहे, ‘आपणदेखील असंच तक्रारयुक्त जीवन जगता का?’ याचं उत्तर जर ‘हो’ असं असेल, तर प्रस्तुत पुस्तक निश्चितच आपल्यासाठी ‘वरदान’ ठरेल!
Reviews
There are no reviews yet.