नका करू क्रोध, घ्या आत्मशोध
मनुष्यानं स्वतःच्या भावना जाणाव्यात, यासाठीच क्रोधाचं आगमन होतंं. तेव्हा क्रोध करू नका, तर “क्रोध म्हणजे नक्की काय’ हे समजून घ्या.
क्रोध करणं म्हणजे इतरांच्या चुकीची शिक्षा आपण भोगणं आणि जणू पेटता निखारा स्वतःच्या हाती पकडणं! क्रोधाला बळी पडून मनुष्य अपराधी बनतो. इतकंच काय तर क्रोधामुळे अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त होतात. क्रोधित झालेला मनुष्य युद्ध छेडायलाही मागे पुढे पाहत नाही. पण क्रोधातून मुक्त होण्याचा रामबाण उपाय म्हणजे “आत्मशोध’ घेणं; अर्थातच स्वतःचं मूळ रूप ओळखणं!
प्रस्तुत पुस्तकात सरश्रींनी क्रोधामागील कारणं आणि त्यांवरील उपाय यांविषयी अत्यंत सोप्या भाषेत ज्ञान प्रदान केलंय. तुम्हाला क्रोधातून मुक्त होत शांतीच्या शिखरावर पोहोचायचं असेल, तर या पुस्तकाचं वाचन सुरू करा… आज, आता, या क्षणी!
Reviews
There are no reviews yet.