विनर्स वर्सेस लूजर्स
विनर्स कधीही सबबी सांगत नाही आणि सबबी सांगणारा कधी विनर बनत नाही. तुम्ही स्वतःला यातील कोणत्या श्रेणीत ठेवू इच्छिता? प्रत्येकाला यश प्राप्त करायचं असतं, अपयश कोणाला आवडतं? मग तुम्ही तुमच्या यशात सबबींना स्थान का देताय? कारणरूपी भिंत का बांधत आहात? सबबी देणं तुम्हाला सुखद वाटेल, पण त्या तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करतील, त्याआधीच त्यातून मुक्त होण्याची युक्ती आत्मसात करा.
प्रस्तुत पुस्तकात तुम्हाला ते सर्व काही मिळेल, ज्यामुळे तुम्ही सबबी देणं सोडून द्याल, यशाच्या दिशेने आपली पावलं उचलाल. जसं-
यश प्राप्त करण्याचा अचूक फॉर्म्युला.
सबबीचे प्रकार, कारण आणि त्यापासून होणारे नुकसान.
कोणतंही कार्य ठामपणे करा, कम्फर्ट झोन तोडा. (Do it anyway)
कर्मकवच धारण करून एक्झीक्युटर बना, कार्याला पूर्णत्व द्या.
सबबीपासून वाचण्यासाठी कार्यांची मोमेंटम कायम ठेवण्याचे उपाय.
दूरदर्शिता ठेवा, सबबींपासून मिळणार्या क्षणिक लाभांपासून वाचा.
विश्वास नाही होत? मग हाताच्या कंकणाला आरसा कशाला? उचला पुस्तक आणि सबबीतून मुक्त होण्यासाठी सगळे मार्ग जाणून घ्या.
Reviews
There are no reviews yet.