मनःशांती आणि आत्मशक्तीची दौलत…
विचारांना दिशा देऊन परमशांतीचा अनुभव घेण्यासाठी आवश्यक असणारा विधी म्हणजे ‘ध्यान’! कित्येक लोकांच्या मनात ध्यानाबाबत अनेक गैरसमज असतात. मग ध्यान कधी ‘व्यवधान’ बनतं, हे लक्षातच येत नाही. प्रस्तुत पुस्तक म्हणजे वाचकांना ध्यानाबाबत सखोल मार्गदर्शन करणारं ज्ञानामृतच! कारण यात समाविष्ट आहेत, ध्यानाशी निगडीत एकूण 90 भाग. प्रत्येक भागात वाचकाला ध्यानाबाबत नवीन दृष्टिकोन प्राप्त होतो. शिवाय, तो नकारात्मक विचारांतून मुक्त होऊन मनःशांती आणि आत्मशक्तीची दौलत प्राप्त करतो. मग त्याची समाधी अवस्थेकडे यात्रा सुरू होते. याव्यतिरिक्त प्रस्तुत पुस्तकात वाचा-
* ध्यानाचा खरा अर्थ
* इंद्रियांना प्रशिक्षित कसं करावं
* ध्यानाबाबतचे गैरसमज
* ध्यानाचे मुख्य 6 लाभ
* ध्यानासाठी योग्य मुद्रा, स्थान, आसन
* विचारांपासून अलिप्त होण्याची कला
* नकारात्मक भावनांतून मुक्ती
* निर्विचार अवस्था प्राप्त करण्याचं रहस्य
* विविध ध्यानविधी
* ध्यानाविषयी सखोल मार्गदर्शन करणारे एकूण 90 भाग
Reviews
There are no reviews yet.