ध्यान आव्हानासाठी आपण तयार आहात का
धावपळीच्या दैनंदिन जीवनात आपण सर्वजण ध्येयपूर्तीसाठी झटत असतो आणि त्यामुळे येणार्या तणावाचा सतत सामना करत असतो. या दरम्यान ध्यानाचा विचारही आपल्याला कठीण आणि वेगळा वाटतो. ‘ध्यान साधना केवळ साधूसंन्यासी करतात, दररोज वेगळ्या आव्हानांचा सामना करणारे आपल्यासारखे व्यग्र लोक ध्यान कसं करणार?’ अशी आपली धारणा असते.
परंतु, ध्यान हे सर्वांसाठी असू शकतं का? प्रस्तुत पुस्तक ध्यानासंबंधित अशा कित्येक धारणा दूर करेल. ध्यानाची सहजता, सुगमता प्रकाशात आणेल.
यात आपण जाणणार आहोत, ध्यानामुळे एकाग्रता आणि कार्यक्षमतेत सुधारणा कशी होते? भावनांवर नियंत्रण आणि आंतरिक गहन शांतीचा अनुभव कसा येतो? योग्य समजेसह, ध्यान केल्याने केवळ बाह्य यशच संपादन होत नाही, तर आपल्या वास्तवातील गहिर्या अस्तित्वाशी आपण परिचित होतो.
चला तर मग! हे ध्यान आव्हान स्वीकारून, स्वतःचा शोध घेण्यास तुम्ही तयार आहात का? उत्तर जर ‘हो’ असेल, तर उघडा हे पुस्तक आणि सुरू करा आजच, परिवर्तनाचा प्रवास!
Reviews
There are no reviews yet.