हे पुस्तक विशिष्ट ध्यान पद्धतींचा आविष्कार असून यात बावन्न प्रकारच्या नावीन्यपूर्ण, सुलभ ध्यानप्रणाली दिलेल्या आहेत… त्यामुळे ध्यानासारख्या जटिल व कठीण वाटणार्या विषयाचा तळ आपल्याला सहजरीत्या गाठता येईल… ‘ध्यान’ अनाकलनीय नसून आपले स्वतःचे असणे आहे… स्वतःचे अस्तित्व आहे… यासारख्या गहन गोष्टींचे आकलन या पुस्तकाद्वारे होईल… ध्यानाबाबत निखळलेले दुवे साधण्याचा प्रयत्न यात केला असून वाचकांना अगदी सोप्या शब्दात ध्यानसंपदा प्रदान केली आहे…
जे आपण नाही त्याला विलीन करणे, जे आपण आहोत त्याला जागृत करणे म्हणजे ध्यान!… वास्तविक, ध्यान म्हणजे मनाचा विश्राम! दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराप्रमाणे मनालाही विश्रांतीची गरज असते. अशावेळी ध्यानरूपी घुटी मनाला तणावमुक्त करते. ध्यानामुळे माणसाच्या चेतनेचा स्तर वाढून अहंकार विलीन होतो. त्यामुळे माणूस जीवनाविषयी योग्य निर्णय घेऊन इतरांच्या आनंदाचे कारण तर बनतोच शिवाय स्वतःही आनंदित होतो…
इतरांचे डोळे उघडण्याच्या प्रयत्नात लोक स्वतःच अंध होतात. आपले अंतःचक्षू उघडण्यासाठी ‘ध्यानदीक्षा’ घेऊन बाह्य नेत्र बंद ठेवण्याची तयारी ठेवा… म्हणजे वाचता वाचताच ध्यान लागेल, किमान आपले तरी…
Reviews
There are no reviews yet.