आयुष्याचे संतुलन
धन आणि ध्यान… अतिशय साम्य असणारे हे दोन परस्परविरोधी शब्द! निरंतरतेने ध्यानधारणा करणाऱ्या मनुष्याच्या मनात वैराग्यभाव निर्माण होतो आणि असा मनुष्य धनसमृद्धीकडे पाठ फिरवतो, हा एक गैरसमज आपल्या समाजात आजही रूढ आहे. शिवाय, धनाढ्य मनुष्य ध्यान करण्यासाठी उत्सुक नसतो, हीदेखील चुकीची धारणा जनमानसात रुजली आहे. पण प्रस्तुत पुस्तकात नेमक्या याच दोन गोष्टींचा विलक्षण सुंदर मेळ घालण्यात आलाय. धन आणि ध्यान… अर्थातच भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाचं संतुलन!
याशिवाय प्रस्तुत पुस्तकात वाचा-
* मानवी जीवनाचं मूळ लक्ष्य
* “संसार आणि अध्यात्म’ या दोन विपरीत गोष्टींचं अनोखं संतुलन
* ध्यान म्हणजे काय?
* ध्यानाचे विविध प्रकार
* शरीराला आणि मनाला योग्य प्रशिक्षण कसं द्यावं?
* वर्तमानात जगण्याची कला
* ध्यानात येणारे अडथळे आणि त्यावरील उपाय
* धनसमृद्धीचं रहस्य
* केवळ धनाने नव्हे, तर ध्यानानेही समृद्ध होण्याचं मर्म
आजच्या 21व्या शतकात मनुष्य केवळ धनाने समृद्ध होण्यासाठी धडपडतोय. पण धनाला जर ध्यानाचीही जोड मिळाली, तर तो मनाने समृद्ध आणि संतुष्ट होणार नाही का?
Reviews
There are no reviews yet.