“तेरा तुझको अर्पण, इन्शा अल्लाह, दाय विल बी डन, तुझी इच्छा पूर्ण होवो, जो हुकूम’ नाव बदलण्याने सत्य, ईश्वर, स्रोत, स्वानुभव (“स्व’भाव) आणि धर्म वेगळा होत नाही.
मानवधर्माची खरी ओळख
आज जगाला नव्या धर्माची आवश्यकता नसून, सर्व धर्म एकत्र गुंफणाऱ्या धाग्याची गरज आहे. तो धागा म्हणजे समजेचा, जाणिवेचा. प्रत्येक धर्मात एकाच सत्याकडे निर्देश केला आहे. “इन्शा अल्लाह, दाय विल बी डन, तुझी इच्छा पूर्ण होवो, जो हुकूम, तेरा तुझको अर्पण’ या सर्व शब्दांचा अर्थ एकच आहे. हे सगळे शब्द ईश्वर, अल्लाह, वाहेगुरू यांच्या स्तुतीपर आणि समर्पणभाव दर्शवण्यासाठी संबोधले आहेत. सगळ्यात एकाचीच स्तुती केली आहे. नाव बदलण्याने सत्य, ईश्वर, स्रोत, स्वानुभव (“स्व’भाव) आणि धर्म वेगळा होत नाही.
प्रत्येक धर्माच्या विचारांचं महत्त्व समजून घेऊन खऱ्या अर्थानं त्याची परिभाषा तयार करणं, हाच या पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक विश्वातील सर्व नागरिकांना “सर्वधर्म समभावाची’ शिकवण देतं. तुमचा धर्म कोणताही असो तुम्हाला तो सोडायला सांगितलं जात नसून त्यामध्ये जोडायची आहे केवळ “समज’.
Reviews
There are no reviews yet.