p style=”text-align: center”>भक्ती क्षेत्र-क्षेत्रज्ञ ज्ञान गीता यथार्थ जीवन जगण्याची युक्ती
डिअर ऑफ गॉड – ईश्वराचा हंस
आपण ईश्वराचे प्रिय (डिअर) बनला आहात, की बनू इच्छिता? कारण ज्याला भक्तीचा पुरस्कार मिळतो, तो डिअर ऑफ गॉड बनतो. एखाद्या कलाकाराने जर त्याच्या कलेतील सर्वोच्च शिखर गाठलं, तर मग त्याच्यासाठी आणखी काय शिल्लक राहतं? त्याचं कलेवरील प्रेमच त्याला त्या क्षेत्रात टिकवून ठेवू शकतं. आता त्याला आणखी कोणत्याही पुरस्काराची आकांक्षा उरत नाही. निरपेक्ष प्रेम किंवा भक्ती हादेखील असा पुरस्कार आहे, जो लाभल्यानंतर अन्य कोणत्याही पुरस्काराची अभिलाषा राहत नाही. खर्या अर्थाने हा पुरस्कारांचा पुरस्कार आहे.
हा पुरस्कार प्राप्त करून मनुष्य शरीर आणि ईश्वर यांमधील भेद समजून ईश्वराचा हंस बनतो, यथार्थ जीवन जगू लागतो. शरीराला साधन समजून त्याद्वारे भक्तियुक्त कर्म करू शकतो. तुझी इच्छा तीच माझी इच्छा, असंही म्हणू शकतो. प्रस्तुत पुस्तक भक्तीच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकून यथार्थ जीवन जगण्याची युक्ती शिकवतं. जसं-
* सगुण साकार आणि निर्गुण निराकार भक्तीत कोणता फरक आहे?
* क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या ज्ञानात काय फरक आहे? भक्तीचं साध्य काय आहे? भक्तीचा मूळ उद्देश कोणता? भक्ताचे छत्तीस गुण कोणते?
* क्षेत्रज्ञची लक्षणं कोणती?
चला तर प्रस्तुत पुस्तकात दिलेले भक्ताचे छत्तीस गुण आत्मसात करून ईश्वराचा प्रिय बनण्याची युक्ती प्राप्त करू या, ईश्वराचे हंस बनू या.
Reviews
There are no reviews yet.