योग्य-अयोग्य -निवड करण्याची कला
योग्य निवड करण्याची कला
हे खरेदी करू की नको… अमुक ठिकाणी जाऊ की नको… सकाळी लवकर उठून व्यायाम करू की नको… अशा अनेक गोष्टींची निवड मनुष्य दिवसभरात करत असतो. परंतु त्याच्याकडून प्रत्येक वेळी योग्य निवड होतेच असं नाही. वास्तविक योग्य निवड करणं ही एक कला आहे, जी अत्यल्प लोकांना अवगत असते.
चला तर खाली दिलेल्या प्रश्नांद्वारे आपल्या निवडींचं विश्लेषण करू या.
* तुम्ही जीवनात धावपळ का करता?
प्रेम पैसा प्रतिष्ठा पद संतुष्टी
* एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही कशी प्रतिक्रिया व्यक्त करता?
क्रोध नाराजी शांती अस्वीकार
* तुमच्या मूडवर किती निवडी अवलंबून असतात?
एकही नाही अत्यंत कमी जास्त खूप जास्त
* तुमची वर्तमानातील निवड तुम्हाला भविष्यात काय देईल?
आळस आजार व्यसन आरोग्य
* तुमची निवड तुमचा कोणता स्वभाव दर्शवते?
असजगता कमकुवतपणा जागरुकता जबाबदारपणा
वरील गोष्टींमधून उच्च पर्यायाचीच निवड व्हावी अशी तुमची इच्छा आहे का? या प्रश्नाचं उत्तर जर ‘हो’ असं असेल, तर हे पुस्तक वाचायला विलंब करू नका… रेडी… ऑन युवर मार्क… गेट… सेट… गो…
Reviews
There are no reviews yet.