विचारांना द्या दाद, कर आनंदाचा नाद
महाअनुवादाची किमया, वाचूया ही मजेशीर पुस्तिका…
करतोस नेहमी स्वतःशी संवाद, महाअनुवादाने कर तू नकारात्मकतेवर मात.
घटनेत नसतं कधीही सुख-दुःख, शोध घेण्यासाठी हो तू अंतर्मुख.
दुःख आहे जीवनाची परीक्षा, निसर्ग करू इच्छितो तुझी रक्षा.
नकारात्मक विचारांचा महाअनुवाद योग्य होई जिथे, सुखद भावना उपजतील तिथे.
स्वतःला सांग यथायोग्य वार्ता, गवसेल तुला आनंदाचा रस्ता.
लोकांच्या अपशब्दांकडे करशील जेव्हा दुर्लक्ष, आयुष्यात तेव्हाच होईल तुझा उत्कर्ष.
मिळालीय तुला संपन्नतेची संपदा, दर्शवतात या तुझ्या अंतरीच्या भावना.
आपल्याला जेव्हा कधी जीवनरूपी संगीत बेसूर वाटू लागेल, तेव्हा प्रस्तुत पुस्तिकेत दिलेल्या लयबद्ध महाअनुवादांचा अवश्य लाभ घ्या. ज्यायोगे आयुष्यात मधुर स्वर निनादू लागेल. प्रत्येक क्षेत्र सुस्वरांनी झंकारेल, सुख-समृद्धीने बहरेल…
Reviews
There are no reviews yet.