विचार नियम
तिसरा चमत्कार समजण्यापूर्वी संपूर्ण ज्ञानाचे चार आयाम समजूया. पहिला आयाम – आसनायाम, दुसरा आयाम – प्राणायाम, तिसरा आयाम-विचारायाम, चौथा आयाम – मौनायाम. विचारांचा तिसरा आणि चौथा आयाम, जो विचारसूत्र आणि मौनमंत्राच्या रूपात या पुस्तकात प्रस्तुत केला आहे, त्याचा उपयोग करून आपण निर्मळ मन, प्रशिक्षित शरीर, उपजिविका लक्ष्य, आदर्श वजन, दीर्घायुष्य, चांगले मित्र, कलाकौशल्य, निरोगी जीवन, योग्य जीवनसाथी आणि पृथ्वीलक्ष्य प्राप्त करू शकता.
आपला एक सशक्त विचारदेखील विश्वाला नवीन दिशा देऊ शकतो. काय म्हणता, ‘हे कठीण आहे.’ तर मग निश्चितच हे पुस्तक वाचणं आपल्यासाठी अनिवार्य आहे. पुस्तक वाचल्यानंतर उद्दिष्टपूर्ती सहज, सुलभ होऊन विचारांचा तिसरा आयाम म्हणजे विचारनियमापर्यंत आपण पोहोचला असाल.
आपण आधीपासूनच आशावादी दृष्टिकोन ठेवत असाल तर हे पुस्तक आपल्यासाठी परमसंतुष्टीचं कारण बनेल. प्रत्येक समस्येचं निरसन आपल्या अंतर्यामीच आहे यावर विश्वास ठेवा. या विश्वासासह हे पुस्तक वाचायला आरंभ करा. सकारात्मक परिणामांवर आणि आपल्या यशस्वीतेवर विश्वास ठेवा. आपल्यात जर श्रद्धा, आशा आणि या पुस्तकाचं ज्ञान असेल तर तिसरा चमत्कार तुमच्यासाठी सहज शक्य आहे.
चला तर मग ‘विचारायाम’चा जो पूल आहे… तो लीलया पार करून मौनाचा साक्षात्कार करूया… कुठे? महानंदाच्या साम्राज्यात…!
———
परिवारासाठी विचार नियम – हॅपी फॅमिलीचे सात सूत्र
सरळ नियम, आश्चर्यजनक परिणाम
‘विश्वात आप्तस्वकीय आणि सहकारी यांच्या साहाय्यानेच मनुष्य कोणतंही मोठं यश प्राप्त करू शकतो’ या विधानाशी आपण सहमत आहात का? आपलं उत्तर जर “हो’ असेल, तर इतरांकडून सहकार्य कसं प्राप्त करावं? या विषयीचं मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तकात आपल्याला मिळेल. इतकंच नव्हे, तर आपल्या कुटुंबाच्या सर्वोच्च शक्यता विकसित होण्यासही हे साहाय्यकारी ठरेल.
प्रेम, आनंद, विश्वास, शांती, माधुर्य आणि सुदृढ संवादमंच यांसारखे अनेक सकारात्मक पैलू आपल्या परिवाराचा पाया बनू शकतात. मात्र त्यासाठी अत्यंत परिणामकारक ठरलेले “विचार नियम’ जाणून ते आत्मसात करायला हवेत. हे नियम अतिशय सहज, सरळ असले, तरी आश्चर्यकारक परिणाम देऊ शकतात.
प्रस्तुत पुस्तकात वाचा –
आपल्या विचारांचा परिवारावर होणारा प्रभावशाली परिणाम
आपल्या विचारांना दिशा देऊन आनंदित परिवार कसा निर्माण कराल
कसा तयार होईल स्वस्थ परिवारासाठी “पॉवर हाउस’
कुटुंबात प्रेम, आनंद, शांती, स्वास्थ्य, समृद्धी आणि संतुष्टी आकर्षित करण्याचं रहस्य
नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून आपल्या परिवाराची रक्षा करण्याची युक्ती
योग्य संवादाद्वारे परिवाराला स्वर्ग बनवण्याचं गुपित
क्षमा, शोध आणि कृतज्ञतेच्या शक्तीने नात्यांमध्ये पूर्णता प्राप्तीचे उपाय
आपल्या कुटुंबात आश्चर्यकारक परिवर्तन बघण्याची अपेक्षा असेल, तर सात विचार नियम आणि उपाय जीवनात आचरणात आणा. मग बघा, आपल्याला जे हवंय, ते निश्चितच प्राप्त होईल!
——————-
स्वास्थ्यासाठी विचार नियम
प्रत्येक आजारावरील उपचार तुमच्याच अंतर्यामी आहे
तुम्ही खरंच समृद्ध आहात का? उत्तर देण्यापूर्वी क्षणभर थांबा. कारण तोच मनुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध असतो, ज्याच्याकडे “संपूर्ण स्वास्थ्या’ची दौलत असते. तुमचं स्वास्थ्य आणखी उत्तम बनू शकतं, असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला स्वास्थ्याच्या शिखरावर पोहोचायचंय का? जर तुमचं उत्तर “हो’ असेल, तर प्रस्तुत पुस्तक तुमच्यासाठी “डॉक्टर’ची भूमिका निभावू शकेल.
“स्वास्थ्यासाठी विचार नियम’ हे एक असाधारण पुस्तक आहे. कारण यात समाविष्ट असलेली सूत्रं अत्यंत स्पष्ट, साधी-सोपी आणि अत्यंत शक्तिशाली आहेत. ही सूत्रं तुम्हाला आजारांतून, वेदनेतून मुक्त होण्यासाठी नक्कीच मदत करतील. प्रस्तुत पुस्तकात वाचा-
* स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी “विचार नियमां’नुसार, विचारांत कोणतं परिवर्तन करायला हवं?
* आजारपण आणि वेदना यांचा मानसिक स्तरावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल?
* नकारात्मक भावनांतून मुक्त होत स्वास्थ्य कसं प्राप्त करावं?
* स्वास्थ्यासाठी “पॉवर ऑफ फोकस’ हे तंत्र कशा प्रकारे उपयोगात आणाल?
* दैनंदिन जीवनात कोणत्या “स्वास्थ्य टिप्स’ वापरायला हव्यात?
* शरीराच्या प्रत्येक अवयवाची क्षमा मागून स्वास्थ्याचं शिखर कसं गाठाल?
* स्वीकार, स्वसंवाद आणि धन्यवाद यांच्या मदतीने प्रत्येक आजारातून मुक्त कसं व्हाल?
स्वास्थ्याची दौलत प्राप्त करून खऱ्या अर्थानं समृद्ध होण्यासाठी हे औषध घ्यायला (पुस्तक वाचायला) सुरूवात करा… कमीत कमी दोन वेळा.
Reviews
There are no reviews yet.