‘विचार नियम’… सरश्रींच्या अमूल्य लेखणीतून साकारलेलं अद्वितीय पुस्तक! लाखो लोकांच्या जीवनात वैचारिक क्रांती घडवून आणणारा ग्रंथ. या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली सात विचारसूत्रे म्हणजे यशोशिखरावर नेणार्या जादुई पायर्या. आज ‘विचार नियम’ पुस्तक वाचणारा प्रत्येक वाचक प्रेम, आनंद, शांती, समृद्धी आणि संतुष्टीचं वरदान प्राप्त करतोय. विचार नियम या विषयाइतकाच दुसरा महत्त्वपूर्ण विषय म्हणजे सर्व प्रकारच्या कर्मबंधनांतून मुक्त करणारी ‘क्षमासाधना’. या दोन्ही विषयांचे विविध पैलू सरश्रींनी अनेक प्रवचनांतून सविस्तरपणे मांडले आहेत. प्रस्तुत पुस्तिका म्हणजे या दोन विषयांचं सारांशरूपातील सादरीकरण!
यशस्वी सांसारिक आयुष्य असो वा मोक्षप्राप्तीचं लक्ष्य, विचारांचं शास्त्र जाणल्याशिवाय मनुष्य कोणतीच गोष्ट प्राप्त करू शकत नाही. शिवाय, क्षमासाधना केल्याशिवाय तो नकारात्मक विचार आणि दुःखदायक भावनांतून मुक्त होऊ शकत नाही. म्हणूनच ज्याला सर्वोच्च आनंद हवाय, त्यानं ही पुस्तिका कायम जवळ बाळगायला हवी… विचार नियम आणि क्षमेची जादू जीवनाच्या प्रत्येक स्तरावर अनुभवायला हवी.
Reviews
There are no reviews yet.