समस्या… विकासाची सुवर्णसंधी!
‘तहान लागण्यापूर्वीच विहीर खोदायला हवी’ ही गोष्ट सर्वांनाच मान्य असते. मग समस्या येण्यापूर्वीच तिचं निराकरण प्राप्त करण्याचं प्रशिक्षण मनुष्य का घेत नाही? याचं उत्तर जाणण्यासाठी वाचा –
* समस्यांचं दुःख नाहीसं व्हावं यासाठी समस्यांचा सामना कसा करावा?
* आपल्या समस्येतच दडलेलं उत्तर कसं शोधाल?
* समस्येत समाधानासह कोणती भेट दडलेली असते?
* समस्या आल्यानंतर सर्वप्रथम काय कराल?
* समस्यामुक्तिमंत्राचा उपयोग कसा कराल?
* तुमची समस्या ही तुमची नाहीच, यावर तुमचा कितपत विश्वास आहे?
ज्या वृक्षांना जीवनात वादळांचा सामना करावा लागतो, तेच मजबूत बनतात. परंतु, ज्या वृक्षांना वादळांना सामोरं जावं लागत नाही, ते मोठे झाल्यानंतर छोट्याशा वार्यानेही उन्मळून पडतात. मात्र, वादळांचा सामना केल्याने झाडाची मुळं इतकी मजबूत बनतात, की त्यांना काहीच फरक पडत नाही.
येथे वृक्ष मनुष्याचं आणि वादळ म्हणजे समस्यांचं प्रतीक आहे. म्हणून तुमच्या समस्यांकडे या क्षणापासूनच विकासरूपी सुवर्णसंधीत म्हणजेच वरदानाच्या रूपात पाहायला सुरुवात करा. या लहानशा बदलाने आपण आश्चर्ययुक्त, समस्यामुक्त जीवनाचा आनंद उपभोगाल, हे निश्चित!
Reviews
There are no reviews yet.