नाविन्याचा आविष्कार
‘किती बोअर रुटीन लाईफ सुरु आहे ना… रोज तेच ते काम करुन कंटाळा आलाय… काहीतरी चेंज हवाय मला… ही माणसं कधी जाणार माझ्या आयुष्यातून… कधी मोकळा श्वास घेणार मी… सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते… ’ कदाचित तुमच्या मनात हेच संवाद सुरु आहेत का? तसं असेल तर तुम्हाला नवविचारांची शक्ती कोणता चमत्कार घडवू शकते, हे जाणून घ्यावं लागेल. कारण समस्या कोणतीही असो, तिचं निरसन नावीन्यपूर्ण पद्धतीने करता येतं.
तुम्हाला नाविन्यपूर्ण विचारांचा आविष्कार प्रत्यक्षात पाहायचा असेल आणि आयुष्यात नवकल्पनांना बहरु द्यायचं असेल, तर प्रस्तुत पुस्तक तुम्हाला एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवेल. कारण या पुस्तकात तुम्हाला गवसेल, तुमच्या अंतर्यामी वसणारा रचनात्मक योद्धा ‘विक्रम’… जो प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाऊन ती पूर्णतः विलिन करण्याची शक्ती बाळगतो, जो तुमच्या जीवनात नाविन्यपूर्ण कल्पना, सृजनात्मक विचारशैली, प्रेम, आनंद, शांती आणि समृद्धीचा वर्षाव करतो.
वाचकमित्रहो, रचनात्मक विचार सूत्र आत्मसात करुन नव्या आयुष्याचा आजच शुभारंभ करा…
Reviews
There are no reviews yet.