या पुस्तकातील चौफेर गोष्टींमुळे तुमचे जीवन चंद्र-तार्यांसारखे उजळून निघेल.
आत्ता, या क्षणी तुमच्या हातात जादूची छडी आहे! विश्वास नाही बसत ना? हातातील जादूची छडी फिरवून क्षणात जादूगार जशी वस्तू गायब करतो, तसेच हे पुस्तकही एक जादूची छडीच आहे. ही छडी फिरवायची नसून त्याचे पुन्हा पुन्हा पठण करायचे आहे. त्यातून जे काही आपल्याला समजेल त्यावर त्वरित अंमल करा आणि अनुभवा या पुस्तकाची कमाल!
जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्रोधावर या पुस्तकात दिलेले उपाय करून पहाल तेव्हा आपल्यातील सर्व वाईट सवयी निश्चितच संपून जातील. त्यातूनही ज्या काही थोडया-फार वाईट सवयी मागे राहतील, त्यांवरही निरंतर उपाय करून त्या नष्ट करता येतील.
हे पुस्तक आपल्यासाठी एक सुंदर संदेश आहे. ते वाचून त्यातील संदेश ग्रहण करून तुम्हाला ‘अच्छा आणि सच्चा बच्चा’ बनायचे आहे का?
या पुस्तकाची सरळ, सोपी रचना चार भागांत केली आहे, त्यामुळे हे पुस्तक समजण्यास अधिक सुलभ होईल. या पुस्तकात दिलेली चित्रेदेखील तुम्हाला सर्व गोष्टी स्मरणात ठेवण्यास साहाय्यक ठरतील.
हे पुस्तक आपल्याला उज्जवल जीवनाचा पाया रचेल हे निश्चित.
Reviews
There are no reviews yet.