आनंदाचं रामराज्य
युवकांनो, रामायण आजही सुरुच आहे! आश्चर्य वाटलं ना वाचून? पण हो, रामायण आजही सुरुच आहे. तेही प्रत्येक घर, समाज, विश्वात आणि सर्वांच्याच अंतरंगात. परीक्षेचं टेन्शन, नात्यांमधील दुरावा, आत्मविश्वासाचा अभाव, भय, चिंता, क्रोध, बोरडम, आळस, डिप्रेशन, द्वेष, मत्सर, करिअरची अवास्तव काळजी, मोबाइलचा अतिवापर, इंटरनेट-सोशल नेटवर्किंगचं अॅडिक्शन, मनात उसळणारे वासनाविकार आणि प्रत्येक घटनेत डोकं वर काढणारा अहंकार… रावणाला तर दहाच चेहरे होते, पण आपले विकार आणि चुकीच्या सवयी मोजल्या तर त्या नक्कीच दहापेक्षा अधिक असतील. तेव्हा खरा विकाररुपी रावण आपल्याच मनात दडून बसलाय. पण त्याचा वध करुन प्रेम, आनंद आणि शांतीचं रामराज्य आणणारे प्रभू श्रीरामही आपल्याच अंतरंगात आहेत. तेव्हा तयार आहात, विकारांच्या लंकेचं दहन करुन दररोज विजयादशमी दसरा साजरा करण्यासाठी?
Reviews
There are no reviews yet.