विचार बदला, नात्यांमध्ये व्यवहार बदलेल
नातेसंबंध मधुर, स्वस्थ आणि सुदृढ करायचे असतील, तर प्रस्तुत छोट्याशा परंतु अतिशय परिणामकारक पुस्तकात वाचा :
* नकारात्मक विचार करणार्या लोकांपासून सावध राहा.
* सोनेरी नियमाची अंमलबजावणी करून नात्यांत त्यांचा चमत्कार पाहा.
* नकारात्मक विचारांत न अडकता नात्यांमध्ये समजूतदारपणा दाखवा.
* तिरस्काराचा दुर्गंध नष्ट करून क्षमेचा सुगंध सर्वत्र दरवळू द्या.
* सर्वांत आधी काय? अहंकार की प्रेम?
* कुटुंबातील वादविवाद संपुष्टात आणा, संवादमंच बनवा.
* नाती रडत-खडत नव्हे, तर गुणगुणत सुदृढ करा.
कित्येक कुटुंबात सतत तणावग्रस्त वातावरण असतं, नेहमी वादविवाद होत राहतात. आपल्या कुटुंबात असं होऊ नये, असं वाटत असेल, तर आधीपासूनच याची काळजी घ्या, म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्य परस्परांशी सलोख्याने वागतील. अर्थात, तहान लागल्यावर विहीर खणण्याऐवजी आधीच आपण पाण्याची व्यवस्था केली, तर कोणत्याही समस्येवर योग्य उपाय, योग्य वेळीच आपल्याला गवसेल.
Reviews
There are no reviews yet.