”श्रीमद् भगवद्गीता” हा भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि अत्यंत पवित्र मानला गेलेला ग्रंथ असून ईश्वराची सर्वोत्कृष्ट अभिव्यक्ती, भजन आणि ईश्वराने गायलेलं सुमधुर गीत, गीता आहे…
आज जगात कौरव की पांडव प्रवृत्तीच्या लोकांची संख्या अधिक आहे? मग गीतेची निर्मिती होणं कुणासाठी जास्त गरजेचं आहे? कारण अहंकार आणि समज एकत्र नांदू शकत नाहीत. बुद्धीने निर्णय घेणाऱ्या लोकांसाठी दृश्य जगच महत्त्वपूर्ण असतं. पण निर्णय नेहमी हृदयाद्वारे घ्यायला हवा. या पुस्तकात सरश्रींनी “प्रत्येकाची गीता वेगळी आहे’ ही महत्त्वपूर्ण समज प्रदान केली आहे. ती प्राप्त होताच सर्वत्र उच्चतम विकसित समाजाची निर्मिती होऊन सर्वांच्या चेतनेचा स्तर उच्च होईल… मग प्रत्येकालाच स्वतःची गीता गवसल्याने कुप्रवृत्ती, कपट, शंका, द्वेष यांना जीवनात अजिबात स्थान नसेल. आपण आपल्या मूळ स्वभावापासून दूर गेलो आहोत याचं ज्ञान होताच सत्य जागृत होऊन निर्मिती होईल “स्व”गीतेची…
Reviews
There are no reviews yet.