Gita Series – Adhyay 1 & 2: ज्ञान-विज्ञान गीता – लीला गीतेचा अद्भुत संगम आणि प्रारंभ मानसिक द्विधावस्थेतून मुक्तीसाठी- महान गीता
‘काय करू आणि काय नको…’ या संभ्रमात असलेला अर्जुन ज्यावेळी मोहपाशात अडकलेला होता, त्यावेळी त्याला गीतेच्या रूपात परमज्ञान मिळालं. त्यानंतर तो केवळ जगाच्या या लीलेतच जिंकला असं नव्हे, तर मानवी जीवनाचं अंतिम लक्ष्यदेखील त्याला गवसलं. आपणही आजचे अर्जुन असून, आपल्यालाही दररोज कोणत्यातरी समस्येला सामोरं जावं लागतंच. परंतु या लीलेत दडलेल्या गीतेत आपल्याला अशी समज प्राप्त होते, जी योग्य वेळी सुयोग्य दिशा दर्शवते. आवश्यकता आहे केवळ ज्ञानाच्या या महासागरात मननरूपी रवी फिरवून त्यातून आपली गीता प्राप्त करण्याची! प्रस्तुत पुस्तकात आपण अत्युच्च प्रेम, आनंद आणि शांतीयुक्त जीवन जगण्याची कला शिकणार आहोत…
* आयुष्यातील समस्यांकडे (युद्धाकडे) कोणत्या दृष्टिकोनातून पाहाल?
* संभ्रमित अवस्थेत योग्य निर्णय कसे घ्याल?
* सुयोग्य निर्णय घेताना मनाच्या ज्या सवयी बाधा बनतात, त्या दूर कशा कराल?
* तणावाशिवाय आपली योग्य कर्तव्यं कशी कराल?
* कर्मं आणि अकर्मं योग्य पद्धतीने कशी कराल?
* कर्माद्वारे जी बंधनं बनतात, त्यांतून मुक्त कसे व्हाल?
* जगात सर्व कर्तव्यं करत असताना सुखी, शांत आणि आनंदी जीवन जगून ईश्वराला प्राप्त कसं करालं?
* मृत्यू म्हणजे काय? मरणोत्तरही जीवन असतं का?
वाचकहो, आपल्या अंतर्यामी असलेला कृष्ण तुम्हाला गीता सांगण्यासाठी सदैव तत्पर असतो, साद घालत असतो. मात्र त्याला प्रतीक्षा असते केवळ आपण अर्जुन बनण्याची! चला तर, या ग्रंथाचे पहिले दोन अध्याय, जे आपली आतुरतेने वाट पाहात आहेत, ते वाचायला आरंभ करू या…
Gita Series – Adhyay 3&4: गीता यज्ञ – कर्मफळ आणि सफळ फळ रहस्य जीवनरूपी युद्ध जिंकण्याचं रहस्य उलगडणारी- ‘मास्टर की’
‘आता तर या सर्व गोष्टींसाठी मला अजिबात वेळ नाही… दिसत नाही का, मी किती बिझी आहे… माझ्यावर केवढ्या जबाबदार्या आहेत… त्यासाठी मला किती संघर्ष करावा लागतोय…’ अशा प्रकारे संसारचक्रात अडकलेल्या धावपळीच्या या स्पर्धेच्या युगात तणावपूर्ण आयुष्य जगत असलेल्या मनुष्याला, अध्यात्म आणि मुक्तीविषयी सांगितलं, तर त्याच्याकडून याखेरीज आणखी काय ऐकण्याची अपेक्षा कराल?
तरीही त्याला नेटानं सांगितलं, ‘बाबा रे, एक अशी युक्ती आहे, ज्यायोगे तुझे संघर्ष, समस्या, संपुष्टात येतील, तू सर्व जबाबदार्या सहजतेनं, आनंदानं पूर्ण करशील. किंबहुना त्यांचं तुला ओझंही वाटणार नाही. शिवाय समाधान मिळवण्यासाठी इतरत्र कुठेही जावं लागणार नाही.’ तेव्हा तो काय म्हणेल? ‘अरे मला लवकर सांगा, अशी कोणती मास्टर की, युक्ती आहे, जी माझ्या समस्यारूपी कुलपाची चावी उघडू शकते?’
‘होय,’ अशीच विलक्षण, अद्भुत ‘मास्टर की’ घेऊन प्रस्तुत ‘गीता यज्ञ’ आपल्या सेवेस तत्पर आहे. ज्यात आपण शिकणार आहोत-
* हसत खेळत सहज, सफल जीवन कसं जगाल?
* कर्म करण्याची योग्य पद्धत काय?
* संसारात राहून, आपल्या जबाबदार्या सांभाळून, स्वबोध कसा प्राप्त कराल?
* सुख-दुःखाच्या चक्रातून बाहेर पडून महाआनंदी जीवन कसं जगाल?
महाभारतात श्रीकृष्णाने जी गुरुकिल्ली अर्जुनाला दिली, तीच आपल्यालाही प्रस्तुत ग्रंथाद्वारे मिळत आहे आणि तीदेखील आजच्या लोकभाषेत, आपल्या आवश्यकतेनुसार! या किल्लीद्वारे आपण जीवनातील प्रत्येक युद्ध जिंकण्याचं रहस्य जाणू शकाल.
Gita Series – Adhyay 5&6: मनाला वश करण्यासाठी संयम गीता – कर्मसंन्यास योग
Vandana Babulal Tayade (verified owner) –
गीता का अद्भुत ज्ञान सरश्रीजीने बहुत ही सरल भाषा मे बताया है.आज के युग मे वह ज्ञान जीवन मे कैसे उतारे इसका उत्कृष्ट मार्गदर्शन सभी आयु के लिए अत्यंत उपयुक्त है