ध्यानाचे ध्यान विचार नियम
काही वेळ डोळे बंद करा, सजगतेने जगण्यासाठी…
दररोज रात्री आपण सर्वजण डोळे बंद करतो. पण त्यामागे आपल्याला गाढ झोप लागावी, हाच मुख्य उद्देश असतो. आता मात्र तुम्हाला दिवसातील काही वेळ डोळे मिटायचे आहेत ते, सजगतेने जगण्यासाठी! अर्थातच आंतरिक सजगता प्राप्त करण्यासाठी… हाच ध्यानाचा मुख्य उद्देश आहे. प्रस्तुत पुस्तकात ध्यानासंबंधी काही महत्त्वाचे पैलू समाविष्ट करण्यात आले आहेत :
* ध्यानाद्वारे मनाला प्रशिक्षित कसं कराल?
* ध्यानात साहाय्यक ठरणाऱ्या मित्रांना तुम्ही भेटू इच्छिता का?
* ध्यानात बाधा निर्माण करणाऱ्या शत्रूंवर विजय प्राप्त करण्याची तुमची इच्छा आहे का?
* ध्यान करताना मनातील विचारांचं काहूर थांबावं, असं तुम्हाला वाटतं का?
* ध्यान का, कधी आणि कशा प्रकारे करावं?
* “ध्यान’ आणि “विचार नियम’ यांविषयी जाणून तुमचे अंतर्चक्षू उघडण्याची तुमची इच्छा आहे का? तुमचं उत्तर जर “हो’ असेल, तर प्रस्तुत पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. कारण यात ध्यानाची सुरुवात करणाऱ्यांपासून ते नियमितपणे ध्यान करणाऱ्या साधकांसाठीदेखील मार्गदर्शन उपलब्ध आहे. ध्यानाच्या या प्रवासासाठी आपल्याला शुभेच्छा!
Reviews
There are no reviews yet.