बोरडम एक आजार
बोरडम म्हणजे एक प्रकारे नकारात्मक भावनाच (विकार) म्हणावी लागेल. आपलं मन चुकीच्या दिशेनं जात आहे, हेच ती दर्शवते. याचाच अर्थ, आपलं लक्ष्य एकीकडे तर मन भलतीकडेच वाहवत असतं. एखादी नकारात्मक भावना जेव्हा आपलं मन विचलित करते, तेव्हा तुमचा लक्ष्याशी असणारा ताळमेळ बिघडलेला असतो. परंतु प्रत्येक कार्य ध्येयाशी जोडताच पुन्हा आपल्या मनात सकारात्मक भावनांचं आगमन होऊन उत्साह संचारेल.
बोरडम एक असा आजार आहे, जो मनुष्याला नाइलाजास्तव शरीरहत्या करायला भाग पाडतो. कारण मनुष्य जेव्हा बोर होतो तेव्हा मनोरंजनाचे वेगवेगळे प्रकार शोधून काढतो. मात्र त्यावेळी त्याने, “माझ्या आत नक्की कोण बोर होत आहे?’ हा प्रश्न विचारायला हवा. याचं उत्तर मिळताच मनुष्य आनंदी होऊन उत्सव साजरा करतो. मग बोरडमचा विकार त्याच्यासाठी सिद्ध होईल, “उत्साह वरदान!’
Reviews
There are no reviews yet.