भय छू मंतर
भितीला करा बाय-बाय…
छोट्या मित्रांनो,
सध्या तुमच्या हातात जादूची छडी आहे. काय म्हणालात, यावर विश्वास बसत नाही? पण खरंच या पुस्तकाच्या रूपात तुम्हाला जादूची छडी मिळालीय. तुम्ही जर ही छडी मनापासून फिरवलीत, तर तुमच्या तोंडून केवळ हेच शब्द बाहेर पडतील, ‘भीती… बाय-बाय’.
आता स्वत:ला एक प्रश्न विचारा, ‘मला जर कोणत्याच गोष्टीची भीती वाटली नसती, तर मी काय-काय केलं असतं?’ या प्रश्नावर विचार केल्यास तुम्हाला काही उत्तरं मिळतील. जसे,
मला जर भीती वाटत नसती, तर मी परीक्षेचं टेन्शनच घेतलं नसतं.
मला जर भीती वाटत नसती, तर मी कोणाशीही धीटपणे बोलू शकलो असतो.
मला जर भीती वाटत नसती, तर मी रात्री पाणी पिण्यासाठी अंधारात न घाबरता गेलो असतो.
मला जर भीती वाटत नसती, तर मी कुठल्याच प्राण्याला मुळीच घाबरलो नसतो.
मला जर भीती वाटत नसती, तर मी कितीही उंच ठिकाणी चढू शकलो असतो.
मला जर भीती वाटत नसती, तर मी आजारी असल्यावर कडू औषध आणि इंजेक्शनला मुळीच घाबरलो नसतो.
मला जर भीती वाटत नसती, तर मी प्रत्येक स्पर्धेत आणि परीक्षेत पहिला आलो असतो.
अशाप्रकारची अनेक उत्तरं तुम्हाला सुचतील. पण तुम्हाला माहितीये, की वर दिलेल्या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू शकतात. कारण तुम्हाला या पुस्तकात मिळेल ‘अभय वरदान’. ‘भय छू मंतर’ नावाची जादूची छडी फिरवताच तुम्ही साहसी बनाल.
पण, हे पुस्तक केवळ लहानांसाठी नसून ते पालक, शिक्षक यांसारख्या मोठ्या लोकांसाठीसुद्धा आहे. तेव्हा या पुस्तकाचा लाभ घ्या आणि म्हणा, ‘भय छू मंतर’.
Reviews
There are no reviews yet.