भावनात्मक परिपक्वता (EQ) वाढवा
मानवी भावना क्षणोक्षणी बदलत असतात. मग त्या कोणाच्या काही बोलण्याने, वातावरणाने अथवा सतत घडणाऱ्या घटनांमुळे…! सकाळपासून संध्याकाळपर्यंत भावनांमध्ये चढ-उतार, भरती-ओहोटी सुरूच असते. भावनांच्या या परिवर्तनामागे काय कारण असावं बरं, याचा कधी आपण विचार केला आहे का? भावना आपल्याला कशाचं स्मरण देण्यासाठी निर्माण होतात? आपल्या भावना समजून घेणं, हीदेखील एक कलाच आहे. ज्यांना ही कला साध्य झाली, तेच भावनात्मक स्तरावर परिपक्व होऊन, आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यशप्राप्ती करू शकतात. प्रस्तुत पुस्तकात वाचा :
* व्वा! प्रत्येक घटनेत आनंदाला प्राधान्य द्या.
* आह! आपण रांगेत उभं राहून विकतचं दुःख कसं भोगतो, हे जाणा.
* हुर्रे! आपल्या भावनांना खेळ समजून व्यवहार करा.
* आहा! छोट्या, खोट्या आणि मोठ्या भावनांबाबत सजगता वाढवा.
* उफ्! हृदयात पीडा आणि डोळ्यांत अश्रूरूपी वादळ का आहे, हे समजून घ्या.
* वाह वाह! भावनांना योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी व्यक्त करण्याची कला शिका.
* वॉव! भावनांना अभिशाप नव्हे, तर वरदान बनवा. त्यांना स्वीकारून आयुष्यात परिवर्तन घडवा.
Reviews
There are no reviews yet.