स्त्रीने कशी जाणावी आपली मौलिकता
प्रत्येक मनुष्य एक कच्चा परंतु अस्सल हिरा आहे, मग ती स्त्री असो अथवा पुरुष. आत्मनिर्भरता हा असा रत्नपारखी आहे, जो या हिर्याला पैलू पाडून, त्याच्या सौंदर्यात भरच घालत असतो. प्रस्तुत पुस्तकात आत्मनिर्भरता या पैलूंवरच विवेचन केलं आहे. खर्या आत्मनिर्भरतेच्या पायावरच जीवनाचं उद्दिष्ट गाठता येतं. त्यामुळे आत्मसन्मान जागृत होऊन, त्याच्या बळावर मनुष्य यशस्वितेची उंच उंच शिखरं सर करतो, त्यावर ठामपणे उभा राहू शकतो. या पुस्तकाद्वारे…
* आत्मनिर्भरता आणि आधुनिकता यांची नवी व्याख्या जाणा.
* आपल्यातील सद्गुणरूपी वरदानाला अभिशाप बनवू नका.
* आपल्यातील चुकीच्या सवयींचा त्याग करून, चांगल्या सवयी आत्मसात करा.
* आपली मौलिकता ओळखा.
* सूक्ष्म रेषा ओळखून नातेसंबंधांत सुधारणा करा.
* पुरुषांशी तुलना करण्याच्या वृत्तीतून मुक्त व्हा.
* ध्यान, प्रार्थना आणि मनन करण्याच्या नव्या पद्धती जाणा.
या पुस्तकात आनंदीबाई जोशी, राजमाता जिजाऊ, भुवनेश्वरी दत्त यांसारख्या स्वावलंबी महिलांची उदाहरणं देण्यात आली आहेत. काही वर्षांनंतर या पुस्तकाचं जेव्हा पुनर्लेखन केलं जाईल, तेव्हा या उदाहरणांऐवजी आपलं उदाहरण देता यावं, हाच त्यामागील खरा उद्देश आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून स्वतःच्या आत्मनिर्भर रूपाची अनुभूती घेण्यास सिद्ध व्हा…
Reviews
There are no reviews yet.