अपयशातून मुक्ती आणि विचार नियम
अपयशाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहा
“अपयश’ हे जीवनातील एक असं वास्तव आहे, ज्याचा सामना करूनच आपण यश प्राप्त करू शकतो. खरंतर अपयशाचा सामना करणं हीच यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे. प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून अपयशाकडे योग्य दृष्टिकोनातून कसं पाहावं, हे आपल्याला शिकता येईल. या पुस्तकात दिलेली सूत्रं अगदी सरळ, सुस्पष्ट आणि शक्तिशाली आहेत. प्रस्तुत पुस्तकात वाचा –
* अपयश हे कुठे बाहेर नसून माणसाच्या विचारातच असतं.
* अपयश प्रथम विचारांमध्ये येतं आणि त्यानंतरच ते वास्तवात प्रकटतं.
* अपयश तसं नसतं, जसं आपल्याला वरकरणी दिसतं. तर त्याबाबत आपण जसा विचार करतो, तसंच ते असतं.
* मनुष्यातील आळस, तमोगुण, बहाणे देण्याची सवय या गोष्टीतच अपयशाचं मूळ आहे.
* आपली क्षमता वाढवूनच अपयशावर मात करता येते.
या पुस्तकातील कित्येक बाबी आपल्या जीवनात संपूर्ण परिवर्तन घडवण्यासाठी साहाय्यक ठरतील. मग तुम्ही पुढील मार्गक्रमण अगदी सहजतया करू शकाल.
Reviews
There are no reviews yet.