मानसिक संतुष्टीचं रहस्य
आपले विचार पुढीलप्रमाणे आहेत का –
* मी जबाबदारी घेऊ शकत नाही.
* ‘मी कामचोर आणि आळशी आहे’ असं लोक म्हणतात.
* घरातील सर्व जुन्या वस्तू फेकून द्याव्या असं मला वाटतं. परंतु घरातील अन्य सदस्य वीस-तीस वर्षांपूर्वीच्या जुन्या वस्तूदेखील सांभाळून ठेवतात, म्हणून मला फार दुःख होतं.
* माझ्यावर अन्याय झाला आहे.
* मी कित्येक वर्षांपासून नोकरी मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. परंतु हातातोंडाशी आलेलं यश हुलकावणी देतं.
* ‘कुटुंबातील सदस्य मला वेळ देत नाहीत’ अशी माझी नेहमी तक्रार असते.
विश्वास ठेवा, या पुस्तकातील मार्गदर्शनाद्वारे आपली सर्व दुःखं, अशांती, असंतुष्टी तसेच स्वतःविषयी आणि इतरांविषयीच्या तक्रारी दूर होतील. तसंच तुमचं मन जेव्हा तक्रार करेल, तेव्हा मनाला प्रयोगशाळा बनवून त्यावर शोध करण्याची ही सामग्री आहे, याची स्वतःला आठवण द्या. त्यामुळे तुमच्यातील समजेची मशाल जागृत होऊन तक्रारशून्य जीवनाचा आनंद तुम्ही घेऊ शकाल.
Reviews
There are no reviews yet.