This post is also available in: English Hindi Polish
मला ‘अंतिम सत्य’ काय आहे, हे जाणून घ्यायचंय. पण त्यासाठी शरीराला खरंच पीडा द्यायला हव्यात का, त्यासाठी खरोखरंच कठोर साधना करण्याची गरज आहे का? या प्रश्नां ची उत्तरं मला कुठं बरं मिळतील? सध्या विश्वारत जे अध्यात्म-मार्ग उपलब्ध आहेत, त्यांमध्ये काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय, जणू या मार्गांमध्ये काही त्रुटी आहेत. पण कोणतीही त्रुटी नसणारा असा परिपूर्ण अध्यात्म-मार्ग मला कुठं बरं गवसेल?
वास्तवात आपण नक्की कोण आहोत, याची अनुभूती घेेणं आणि आपल्या वास्तविक ‘स्व’मध्ये स्थापित होणं, हाच मनुष्य-जीवनाचा मूळ उद्देश आहे. ज्या अध्यात्म-मार्गावर या मूळ उद्देशापर्यंत पोहोचण्याचा उपाय गवसतो, तोच ‘योग्य मार्ग’ म्हणायला हवा. बर्याहचदा आपण काही प्रश्नां ची उत्तरं वर्षानुवर्षं ऐकलेली किंवा वाचलेली असतात. पण अशी रूढ उत्तरं बाजूला ठेवून अंतिम सत्याप्रत पोहोचवणारा नवीन मार्ग आपण चोखाळायला हवा.
खरंतर ‘मी कोण आहे’, ‘अंतिम सत्य जाणण्यासाठी कठोर साधना करावी लागते का?’ यांसारखे गूढ प्रश्नत जिथून निर्माण होतात, तिथेच त्यांची उत्तरं गवसतात. हे रहस्य जेव्हा तुमच्यासमोर खुलेल, तेव्हा तुम्ही ‘स्व’अस्तित्वाच्या केंद्रापर्यंत म्हणजेच स्रोतापर्यंत (परमचैतन्यापर्यंत) अगदी सहज पोहोचू शकाल. स्रोेतापर्यंत पोहोचताच मनुष्य दृढतापूर्वक म्हणतो, ‘आता माझ्या जीवनात कोणताच प्रश्नह उरलेला नाही. कारण माझ्या मनातील सर्व शंका-कुशंका विलीन झाल्या आहेत. माझ्या सर्व प्रश्नां ची उत्तरं मला अंतर्यामीच गवसली आहेत.’ ही असते, तेजज्ञानप्राप्तीची अवस्था! तेजज्ञान म्हणजे असं ज्ञान, जे ‘ज्ञान-अज्ञान’ यांपलीकडे आहे… जे केवळ बौद्धिक स्तरावर मर्यादित नसून मनुष्याला ‘स्व’अनुभवाप्रत घेऊन जातं.
तेजज्ञान म्हणजे ज्ञान आणि अज्ञान यांपलीकडे नेणारी व्यवस्था… तेजज्ञान म्हणजे सर्व प्रकारच्या ज्ञानाचा स्रोत! तेजज्ञान म्हणजे मनुष्याला पूर्णत्व प्रदान करणारी बोधप्रणाली, जिच्या प्रकाशात कोणतंही अज्ञान टिकू शकत नाही.
बर्याीच लोकांना वाटतं, संत मीराबाईंनी श्रीकृष्णाची भक्तिगीतं गायली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. पण खरंतर त्यांना झालेल्या ‘स्व’बोधामुळेच त्यांच्या हृदयातून भक्तिरसानं ओथंबलेली भजनं स्फुरली. जिझसनाही ‘स्व’बोध झाल्यानंतरच त्यांचा स्वभाव दयाळू होत गेला. थोडक्यात, सर्व महान संतांना आधी ज्ञानप्राप्ती झाली आणि त्यानंतरच त्यांनी ज्ञानाची, आनंदाची, भक्तीची अभिव्यक्ती केली. ‘आधी अभिव्यक्ती आणि नंतर ज्ञानप्राप्ती’ असं मात्र कधीच घडलं नाही. अशीच ज्ञानप्राप्ती घडवणारी व्यवस्था म्हणजे ‘तेजज्ञान’ होय.
अनेक सत्यशोधकांना त्यांच्या मनात असणार्या सत्यतृष्णेविषयी शंका असते, ‘मी योग्य मार्गावर वाटचाल करतोय ना? हा मार्ग मला अंतिम सत्याप्रत घेऊन जाईल का?’ अशा अनेक शंकांमुळे अनेक साधकांना त्यांच्या अंतर्यामी एक प्रकारची रिक्तता जाणवते. ‘मी निवडलेला मार्ग अपुरा आहे, या मार्गात अशा अनेक त्रुटी आहेत, ज्यांमुळे तो परिपूर्ण वाटत नाही.’ अशा शंकांमुळे मनुष्य नवीन अध्यात्म-मार्ग धुंडाळू लागतो. ‘मी सत्यप्राप्तीसाठी अथक प्रयत्न करायलाच हवेत का? माझ्या मनातील सर्व प्रश्नां ची उत्तरं कोण देऊ शकेल? कदाचित माझंच काहीतरी चुकतंय का?’ असे अनेक प्रश्नर सत्यशोधकाच्या मनात निर्माण होतात.
अशा सर्व शंकाचं आणि प्रश्नां चं एकमेव उत्तर म्हणजे ‘तेजज्ञान’… एक असं सत्य जे ज्ञान आणि अज्ञान यांपलीकडे आहे, जे केवळ अनुभवता येतं. कारण ते शब्दांत व्यक्त करणं, खरंच कठीण असतं. केवळ या सत्याविषयीची ‘समज’ मनुष्य ग्रहण करू शकतो. ‘समज’ हीच आजवरच्या सर्व अध्यात्म-मार्गांतील ‘निखळलेली कडी (मिसिंग लिंक)’ आहे. ही समजच आपल्याला अंतिम सत्यापर्यंत घेऊन जाते.
तेजज्ञान फाउंडेशनतर्फे आयोजित ‘द मॅजिक ऑफ अवेकनिंग’ (महाआसमानी /‘एम.ए.’) या शिबिरामध्ये सरश्री हीच समज प्रदान करतात. या समजेनेच आपल्याला सत्याचा अनुभव प्राप्त होतो, ज्याला आपण ‘आत्मसाक्षात्कार, ईश्वारीय साक्षात्कार, एनलाइटमेंट, स्वबोध, आत्मज्ञान’ अशा अनेक नावांनी संबोधू शकतो. पण लक्षात ठेवा, केवळ योग्य मार्गावर वाटचाल केल्यानेच आपल्याला ईश्वारीय अनुभव प्राप्त होऊ शकतो आणि हा योग्य मार्ग म्हणजे, ‘तेजज्ञान’! तेजज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्याला केवळ श्रवण करावं लागतं. अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या या श्रवण-पद्धतीला ‘सिस्टम ऑफ विझड्म’ असं संबोधलं जातं.
Add comment