आधुनिक युगाचे आईन्स्टाईन
स्टीफन हॉकिंग
खगोलशास्त्राचे महान संशोधक
अलौकिक बुद्धिमत्तेचे धनी
मनुष्याचं ध्येय मोठं असेल, संकल्प दृढ असेल आणि उद्दिष्टपूर्तीसाठी जगण्याची योग्य वाटचाल असेल, तर काळालाही थोपवून ठेवता येतं, हे प्रतिभावंत जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी सिद्ध केलं.
त्यांनी आपल्या शारीरिक दौर्बल्यावर मात करून, ‘इच्छाशक्तीच्या बळावर मनुष्य काहीही करू शकतो’, याचं मूर्तिमंत उदाहरण जगासमोर ठेवलं.
स्टीफन हॉकिंग हे संशोधनकार्यात जगातील विशेष महान शास्त्रज्ञांपैकी एक होते. त्यांनी ब्रह्मांडातील अनेक रहस्यं उलगडली. त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेमुळेच त्यांना नव्या युगातले आईन्स्टाईन असं संबोधलं गेलं.
या पुस्तकाद्वारे आपण जाणाल –
स्टीफन यांचं बालपण कसं व्यतीत झालं?
त्यांचं शिक्षण कुठं व कसं झालं?
बिग बँग थेअरी म्हणजे काय?
‘ब्लॅक होल’बाबतच्या प्रश्नांची उत्तरं काय होती?
स्टीफन यांची भविष्यवाणी काय होती?
Reviews
There are no reviews yet.