एका महान वैज्ञानिकाची प्रेरणादायी जीवनगाथा
‘सर आयजॅक न्यूटन’ विज्ञानजगतातील एक सुपरिचित असं नाव! बहुधा आपण न्यूटन यांना, सफरचंद जमिनीवर पडण्यामागचं रहस्य शोधून काढणारी व्यक्ती म्हणूनच ओळखतो. सामान्य वाटणार्या या एका घटनेवर मनन करून त्यांनी गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला जन्म दिला.
एक घाबरट, लाजराबुजरा आणि मितभाषी मुलगा, ज्याला लहानपणी लोक मंदबुद्धी असंदेखील म्हणत, तो महान वैज्ञानिक सर आयजॅक न्यूटन कसं बनू शकला? हा एखादा चमत्कार होता, की त्यांच्या अंतरंगात अशी एखादी सुप्त शक्ती दडली होती, जी त्यांना कधी पराभूत करू शकली नाही?
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर न्यूटन यांना अडचणींचा सामना करावा लागला, तरी ते त्या अडचणींवर मात करत अग्रेसर कसे होऊ शकले, हे जाणून घेणं हा खरंतर कुतूहलाचाच विषय आहे. प्रस्तुत पुस्तक हे सर आयजॅक न्यूटन यांचा आव्हानात्मक प्रवास आणि त्यांनी लावलेले महान शोध, यांविषयी बरंच काही सांगून जातं. या महान संशोधकाच्या आयुष्याविषयी जाणून आपणदेखील आयुष्याला ‘न्यू टर्न’, नवी दिशा देऊ शकाल, हीच सदिच्छा.
————————————————————————————————————————————————————————————————————————————-
बेंजामिन फ्रँकलिन -राष्ट्राध्यक्ष असूनही राष्ट्राध्यक्ष न बनलेले महापुरुष
‘बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे एकमेव
असे राष्ट्रपती होते, जे कधीही अमेरिकेचे राष्ट्रपती नव्हते.’
वरील विधान बेंजामिन फ्रँकलिन यांच्याबाबत केलं जातं. आज देशभरात त्यांचे शेकडो पुतळे उभारले गेले आहेत, यावरूनच त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य समजू शकतं. अमेरिकन डॉलर, विविध पदकं आणि पोस्टाची तिकिटं अशा वस्तूंवरही बेंजामिन यांची प्रतिमा छापली जात आहे. अमेरिकेतील कितीतरी पूल, शाळा, महाविद्यालयं, हॉस्पिटल्स आणि संग्रहालयं यांनादेखील बेंजामिन यांचं नाव देण्यात आलं. कारण बेंजामिन यांनी जीवनात पैशांपेक्षाही जास्त लोकांचे आशीर्वाद प्राप्त केले. लोकांच्या आनंदातच त्यांचा आनंद सामावलेला होता. आयुष्यात उगाचंच एखाद्याची इतकी प्रसिद्धी होत नाही.
बेंजामिन फ्रँकलिन यांनी दृढ संकल्प आणि नैतिकता या गुणांच्या आधारे मनुष्याची अवस्था कशीही असली, तरी तो मानवजातीसाठी महान कार्य करू शकतो, हे सिद्ध केलं. त्यांच्या चारित्र्यातील या वैशिष्ट्यामुळेच त्यांना ‘अमेरिकेचे जनक’ मानलं जातं. प्रस्तुत पुस्तकात बेंजामिन फ्रँकलिन यांच्या जीवनातील कित्येक प्रेरणादायी घटनांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. साधारण प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारा एक सामान्य मुलगा, स्वतःच्या गुणांचा विकास करून जनसामान्यांसाठी निमित्त बनतो आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचा जनक मानला जातो! हा त्यांचा जीवनप्रवास निश्चितच थक्क करणारा आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, यासाठीच या पुस्तकाच्या माध्यमातून या बहुआयामी व्यक्तीचं जीवनचरित्र आपल्यासमोर सादर करताना अतिशय आनंद होत आहे.
—————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————–
आंतरिक क्षमतेचा दिवा प्रज्वलित करा
प्रस्तुत पुस्तक म्हणजे थॉमस अल्वा एडिसनचं केवळ जीवन चरित्र नाही. तर यात अशा एका मनुष्याचं चित्रण आहे, ज्यानं स्वतःच्या आंतरिक क्षमतेचा शोध घेतला आणि त्या प्रकाशात आणल्या. प्रस्तुत पुस्तकात एडिसन यांना सफल बनवणाऱ्या कारणांवरच केवळ भर देण्यात आलेला नसून त्यांच्या जीवनातील अनेक घटनांच्या माध्यमातून, त्यांच्या चारित्र्याची वैशिष्ट्यंही शब्दबद्ध करण्यात आली आहेत. वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत बोलू न शकणारा मुलगा पुढे औद्योगिक क्रांतीचा मार्गदर्शक कसा बनला? यामागील अदृश्य नियम प्रस्तुत पुस्तकात समजून सांगण्यात आले आहेत.
* अपयशाच्या अंधारात यशाचा शोध कसा घ्याल
* संधी शोधण्यासाठी दृष्टिकोनाचं महत्त्व
* सातत्य, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर महान कार्य करण्याचं धाडस
* केवळ स्वतःचा विचार न करता “अव्यक्तिगत दृष्टिकोन’ बाळगण्याचं महत्त्व
* अशक्य वाटणारं कार्य “सहजशक्य’ करण्याची हातोटी
* हजारवेळा अपयश आल्यानंतरही न डगमगता कार्यरत राहण्याचं रहस्य
* प्रत्येक घटनेत वेगळा विचार करण्याची कला
* स्वतःमधील अगणित शक्यता आणि अमर्याद ऊर्जा यांची ओळख
————————————————————————————————————
मानवी मेंदू हा एक सुपर कॉम्प्युटर असून,
त्यात अफाट कार्य करण्याची आणि
ते साठवून ठेवण्याचीही क्षमता असते.
इतिहासातील सर्वांत बुद्धिमान मनुष्य कोण? असा प्रश्न निर्माण झाला तर सर्वांचं एकच उत्तर असेल, अल्बर्ट आईन्स्टाईन! वेगवेगळ्या युगांतील लोकांनी त्यांना शताब्दी पुरुष, सर्वकालिन महान शास्त्रज्ञ, जीनियस अशा कितीतरी उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. आईन्स्टाईन यांनी आपल्या सिद्धान्तांद्वारे आणि संशोधनाद्वारे विज्ञानाचा चेहरामोहराच पार बदलून टाकला. अतिशय सामान्य मनुष्यदेखील श्रम, हिंमत आणि ध्यास यांच्या साह्याने अनोखं यश प्राप्त करू शकतो. शिवाय लौकिक मिळवून विश्वातील असामान्य व्यक्तींच्या अग्रगण्य यादीत आपलं नाव समाविष्ट करू शकतो.
सापेक्षता सिद्धान्त आणि E = mc2 या द्रव्यमान ऊर्जा समीकरणामुळे आईन्स्टाईन संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. त्यांना सैद्धान्तिक भौतिकशास्त्रात विशेषतः प्रकाश विद्युत प्रभावाच्या नियमांचा शोध लावल्याबद्दल इ.स. 1921 मध्ये विश्वातील सर्वोच्च मानला जाणारा ‘नोबेल पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आलं. मनुष्य एखादं छोटं काम जरी करत असेल, तरी त्याने ते अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने करायला हवं, असं त्यांचं प्रांजळ मत होतं. आपणदेखील एका महान, विलक्षण शास्त्रज्ञाच्या जीवनाचं अवलोकन करून त्यातून प्रेरणा घ्यायला हवी, त्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवं…
—————————————————————————————————————————————————–
Reviews
There are no reviews yet.